Congress News: कार्यकर्त्यांनो, सत्ता, पदे आम्ही उपभोगतो; बैठका तुम्ही करा...

Dharashiva Congress: महासंमेलनानिमित्त धाराशिव येथे आयोजित बैठकीकडे काँग्रेसच्या दिग्गजांनी फिरवली पाठ
Congress News :
Congress News :Sarkarnama

येत्या 28 डिसेंबर रोजी काँग्रेस पक्षाच्या स्थापनेला 138 वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानिमित्त नागपूर येथे पक्षाचे महासंमेलन आयोजित करण्यात आले आहे. त्यासाठी जिल्हास्तरावर तयारी सुरू असून कार्यकर्त्यांच्या बैठका घेऊन मार्गदर्शन करण्यात आले. तशीच बैठक 18 डिसेंबर रोजी धाराशिव येथे झाली. काँग्रेसच्या दिग्गज नेत्यांनी मात्र या बैठकीकडे पाठ फिरवली. मंत्रिपद, आमदारकीही घरात होती. आता जिल्हा बँकेचे अध्यक्षपद घरात, काँग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्षपद, युवक काँग्रेसचे उपाध्यक्षपद घरी असलेल्या मुरुमच्या (ता. उमरगा) गढीवरील नेतेही बैठकीला अनुपस्थित राहिले.

जिल्हाध्यक्ष अॅड. धीरज पाटील यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली. नागपूर येथील हे महासंमेलन ऐतिहासिक ठरणार आहे. तेथून लोकसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकले जाणार आहे. इच्छुकांनी तालुकाध्यक्ष, शहराध्यक्षांकडे नावनोंदणी करावी. काँग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्ष बसवराज पाटील, माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित राहतील असे अॅड. पाटील यांनी सांगितले. महासंमेलनासाठी जिल्ह्यातून मोठ्या संख्येने कार्यकर्ते जाणार आहेत, असेही त्यांनी स्पष्ट केले. महासंमेलनाला काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे, सोनिया गांधी, खासदार राहुल गांधी यांची प्रमुख उपस्थिती असेल.

Congress News :
Nagpur News : एकनाथ शिंदे हे महाराष्ट्रासाठी 'पनौती'; तुपकरांचा हल्लाबोल, पोलिस अन् शेतकऱ्यांमध्ये खडाजंगी

काँग्रेस़चे दिग्गज नेते या बैठकीला अनुपस्थित राहिले. जिल्ह्यात काँग्रेसचा आता एकही आमदार नाही. प्रमुख नेते अलिप्त राहत असल्याने कार्यकर्ते वाऱ्यावर आहेत. बसवराज पाटील हे माजी मंत्री आहेत. 1995 मध्ये उमरगा विधानसभा मतदारसंघातून ते पहिल्यांदा विजयी झाले. पहिल्यांदा आमदार होऊनही काँग्रेसने त्यांना राज्यमंत्रिपद दिले होते. पुढच्या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. 2009 ला उमरगा मतदारसंघ राखीव झाल्याने पक्षांने त्यांना शेजारच्या औसा (जि. लातूर) विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली. तेथून ते सलग दोनवेळा विजयी झाले. गेल्या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. आता ते पक्षाचे प्रदेश कार्याध्यक्ष आहेत. त्यांचे पुत्र शरण पाटील हे युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष आहेत. बंधू बापूराव पाटील हे जिल्हा बँकेचे अध्यक्ष आहेत. यापैकी एकजणही बैठकीला उपस्थित राहिले नाहीत.

महत्वाची सर्व पदे पाटील कुटुंबीयांकडे आहेत. शरण पाटील हे जिल्हा परिषदेचे सदस्य होते. बापूराव पाटील हे दुसऱ्यांदा जिल्हा बँकेचे अध्यक्ष आहेत. बसवराज पाटील हे माजी केंद्रीय मंत्री, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शिवराज पाटील चाकूरकर यांचे मानसपुत्र आहेत. त्यामुळे काँग्रेसमध्ये त्यांचे वजन आहे. राज्य दूर राहिले, जिल्ह्यातही संघटना बांधणीचे काम शून्य असूनही त्यांच्याकडे पक्षाचे प्रदेश कार्याध्यक्षपद चालून आले आहे. त्याच बळावर त्यांचे बंधू बापूराव पाटील दुसऱ्यांदा जिल्हा बँकेचे अध्यक्ष झाले आहेत. निवडणुकीच्या अगदी काही दिवसांपूर्वी औसा मतदारसंघात जाऊन विजय मिळवणाऱ्या बसवराज पाटील यांना २००९ पासून उमरगा मतदारसंघातून एकदाही काँग्रेसच्या उमेदवाराला विजयी करता आलेले नाही.

धाराशिव लोकसभा मतदारसंघात महायुतीतील तिन्ही पक्षांनी निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. इच्छुक कामाला लागले आहेत, मतदारसंघावर दावा ठोकू लागले आहेत. हे जिवंतपणाचे लक्षण मानले जाते. महाविकास आघाडीत मात्र शांतता आहे. खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर हे ठाकरे गटात आहेत. त्यामुळे हा मतदारसंघ ठाकरे गटालाच सुटणार, कदाचित असे समजू महाविकास आघाडीतील पक्ष शांत असतील, मात्र संघटनात्मक पातळीवरही कोणतीही हालचाल होत नसल्याने संभ्रमाचे वातावरण आहे.

Edited by: Mangesh Mahale

Congress News :
Ajara Sugar Factory Election: आजरा निवडणुकीत बनावट मतदान; तिघांवर गुन्हे

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com