Lok Sabha Security Breach: संसदेतील घुसखोरीप्रकरणी लोकसभा सचिवालयाची मोठी कारवाई; आठ कर्मचारी निलंबित

Parliament Security Breach : संसदेत बुधवारी दुपारी धक्कादायक घटना घडली.
Parliament
Parliament Sarkarnama
Published on
Updated on

Delhi News: संसदेत बुधवारी दुपारी धक्कादायक घटना घडली. लोकसभेच्या प्रेक्षक गॅलरीत बसलेल्यापैकी दोघांनी थेट सभागृहात उडी मारत स्मोक कँडल जाळल्या. त्यामुळे संसदेत मोठा गोंधळ उडाला. या प्रकरणी चार जणांना अटक करण्यात आली असून पुढील तपास सुरु आहे. मात्र, या घटनेचे पडसाद गुरुवारी लोकसभेत उमटले.

संसदेत घडलेल्या घटनेची गंभीर दखल लोकसभा सचिवालयाने घेतली. सुरक्षेतील चुकीबद्दल लोकसभा सचिवालयाने आठ कर्मचाऱ्यांना तडकाफडकी निलंबित केले आहे. संसदेत घुसखोरीच्या घटनेनंतर एकच खळबळ उडाली होती. आता या प्रकरणातील आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांना न्यायालयासमोर हजर केले जाणार आहे. पोलिस या घटनेची कसून चौकशी करत आहेत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

स्पेशल टीम करणार तपास

दिल्ली पोलिसांची स्पेशल सेलची टीम संसद भवन परिसरातील घटनेचा तपास करत आहे. या टीममध्ये विशेष आयुक्त, अतिरिक्त आयुक्त, पाच डीसीपी, सात एसीपी आणि 20 पेक्षा जास्त पोलिस निरीक्षकांचा समावेश आहे. या घटनेतील प्रत्येक बाबींचा तपास ही टीम करणार आहे.

संसदेत घुसखोरी करणाऱ्या घटनेतील चारजण वेगवेगळ्या राज्यातील आहेत. तसेच या चारही जणांची संसद भवनात घुसखोरी करण्याचीआधी चंदीगडमध्ये सर्वात प्रथम भेट झाल्याची माहिती समोर येत आहे. या आरोपींमागे काही राजकीय संरक्षण आहे का? की कोणत्या संघटनेचा सहभाग आहे का ? अशा अनेक मुद्यांवर स्पेशल सेलच्या पथकाकडून तपास करण्यात येत आहे.

दरम्यान, संसदेत घुसखोरीची घडलेली घटना ही देशाला हादरवून टाकणारी घटना आहे. आता संसदेच्या सुरक्षिततेमध्ये हलगर्जीपणा केल्याचा ठपका ठेवत लोकसभा सचिवालयाने मोठी कारवाई केली आहे. लोकसभा सचिवालयात काम करणाऱ्या आठ कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आलं आहे.

(Edited by- Ganesh Thombare)

Parliament
Sanjay Raut: 'हे सरकार तकलादू, सुरक्षेच्या नावाने बोंबाबोंब'; राऊतांचा मोदी सरकारवर हल्लाबोल

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com