Parliament Sesson 2024 : संविधानावरून मोदींचा पुन्हा मास्टरस्ट्रोक? महत्वाची माहिती उजेडात आणणार...

PM Narendra Modi Kiran Rijiju Lok Sabha Rajya Sabha : संसदेचे हिवाळी अधिवेशन सोमवारपासून सुरू होत आहे. या अधिवेशनामध्ये सत्ताधारी आणि विरोधक पुन्हा आमनेसामने येणार आहेत.
Constitution Day, Narendra Jagtap
Constitution Day, Narendra JagtapSarkarnama
Published on
Updated on

New Delhi : हरियाणापाठोपाठ महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत भाजपला मोठे यश मिळाल्यानंतर सोमवारपासून संसदेचे हिवाळी अधिवेशन सुरू होत आहे. दोन्ही राज्यांत तसेच लोकसभा निवडणुकीतही विरोधकांनी संविधानाचा मुद्दा प्रकर्षाने मांडला होता. त्यानंतर आता मोदी सरकारकडून विरोधकांना कोंडीत पकडण्यासाठी संविधानाशी संबंधित महत्वाच्या माहितीवर प्रकाशझोत टाकण्यात येणार आहे.

केंद्रीय संसदीय कार्यमंत्री किरिण रिजिजू यांनी रविवारी याबाबत माहिती दिली. ते म्हणाले, उद्यापासून संसदेचे हिवाळी अधिवेशन सुरू होत आहे. मात्र मंगळवारी राज्यसभा आणि लोकसभेचे कामकाज होणार नाही. कारण त्यादिवशी संविधान सभेने संविधान स्वीकारले, त्याचे 75 वे वर्ष होतील. यापार्श्वभूमीवर संविधान दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जाईल.

Constitution Day, Narendra Jagtap
Manoj Jarange Patil : शपथविधीनंतर काही तासांतच नव्या सरकारचं टेन्शन वाढणार! जरांगे पाटलांनी ठणकावून सांगितले

संविधान सभागृहात दोन्ही सभागृहातील सदस्य एकत्रित असतील. यादिवशी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू सदस्यांना मार्गदर्शन करतील. संविधान दिनी काही महत्वाची कागदपत्रे पुस्तकातून प्रकाशित केली जातील. संविधान निर्मितीआधी काय-काय प्रक्रिया झाली होती, यांसह अनेक गोष्टींची माहिती यामध्ये असेल. हे सामान्य पुस्तक नाही. पुस्तकामध्ये असलेली चित्र, त्याचे वर्णन, मुलभूत संकल्पना, त्याची माहिती देण्यात आली आहे, असे रिजिजू यांनी स्पष्ट केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली 2015 पासून देशात संविधान दिन साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला. तेव्हापासून सातत्याने संविधान दिन साजरा केला जात आहे. यावर्षीही 75 वर्षे पूर्ण होत असल्याने दिल्लीपासून संपूर्ण देशात हा दिन साजरा केला जाईल. केवळ एका दिवसापुरता कार्यक्रम नसेल. देशभरातील गावागावांत आम्ही संविधान पोहचवणार आहोत, जेणे करून संविधानाची मुलभूत संकल्पना लोकांना माहिती होईल, असे रिजिजू यांनी सांगितले.

Constitution Day, Narendra Jagtap
Ajit Pawar Video : अजितदादांनी फोडले सुनील शेळकेंच्या विजयाचे गुपित, 'तोच फोटो सगळीकडे फिरवला...'

दरम्यान, लोकसभा निवडणुकीदरम्यान काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यासह विरोधी पक्षांनी भाजपला संविधान बदलण्यासाठी 400 हून अधिक खासदार हवे असल्याचा प्रचार केला होता. हा खोटा प्रचार केल्यानेच विरोधकांच्या जागा वाढल्याचा दावा भाजपने केला होता. सलग तिसऱ्यांदा विजयी झाल्यानंतर पहिल्यांदाच संसदेत गेलेल्या मोदींनी संविधानावर माथा टेकवला होता. तसेच पहिल्या अधिवेशनात काँग्रेसवर शरसंधान साधले होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com