Ajit Pawar Video : अजितदादांनी फोडले सुनील शेळकेंच्या विजयाचे गुपित, 'तोच फोटो सगळीकडे फिरवला...'

Ajit Pawar On Sunil Shelke And PM Narendra Modi Meet : महायुतीला राज्यात घवघवीत यश मिळालं आहे. तर युतीतील घटक पक्ष असलेल्या अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने देखील या निवडणुकीत जोरदार मुसंडी मारत 41 जागा जिंकल्या आहेत. याच विजयाचा जल्लोष सध्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पाहायला मिळत आहे.
Narendra Modi, Sunil Shelke, Ajit Pawar
Narendra Modi, Sunil Shelke, Ajit PawarSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News, 24 Nov : महायुतीला (Mahayuti) राज्यात घवघवीत यश मिळालं आहे. तर युतीतील घटक पक्ष असलेल्या अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने देखील या निवडणुकीत जोरदार मुसंडी मारत 41 जागा जिंकल्या आहेत. याच विजयाचा जल्लोष सध्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पाहायला मिळत आहे.

याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे मावळ विधानसभा मतदारसंघाचे (Maval Assembly Constituency) नवनिर्वाचित आमदार आमदार सुनील आण्णा शेळके यांनी आज अजित पवारांची मुंबईत भेट घेतली. ते अजितदादांचं अभिनंदन करण्यासाठी मुंबईत गेले होते.

यावेळी अजितदादांनी आपण मोदींच्या सभे दरम्यान सुनील शेळके (Sunil Shelke) यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी कशी भेट घडवून आणि त्यांच्या विजयाचा मार्ग कसा सुकर झाला या बाबतचा एक गमतीशीर किस्सा सर्वांना सांगितला.

उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी म्हणाले, "मोदींच्या सभेवेळी सगळे आमदार आतमध्ये आले होते आणि हा बाहेर थांबला होता. याला कोणीच आतमध्ये घेत नव्हतं. त्यावेळी मी मोदींनी सांगितलं की, माझा एक आमदार बाहेर आहे त्याला तोबडतोब आत घ्या. त्यावर मोदींनी सुरक्षा रक्षकांना सांगितलं की, अजित पवार सांगतायत त्यांना आतमध्ये बोलवा.

Narendra Modi, Sunil Shelke, Ajit Pawar
Sanjay Raut : 'गरज सरो, वैद्य मरो'; काय आहे राऊतांची 'भविष्यवाणी'!

आत आल्यावर मी सुनील शेळके यांची मोदींशी वेगळी ओळख करून दिली. याच भेटीवेळीचा फोटो यांने सगळीकडे फिरवला. कारण त्यावेळी सर्व भाजप याच्या विरोधात होती. हा सारखा म्हणायचा 'माझी सीट गेली.' आणि मतदाना दिवशी सांगतो 'मी एक लाखापेक्षा जास्त मतांनी निवडून येणार." असा किस्सा त्यांनी सांगितला.

Narendra Modi, Sunil Shelke, Ajit Pawar
Manoj Jarange Patil : शपथविधीनंतर काही तासांतच नव्या सरकारचं टेन्शन वाढणार! जरांगे पाटलांनी ठणकावून सांगितले

शिवाय यावेळी अजित पवारांनी किती मतांनी विजयी झाला असं विचारलं असता शेळके यांनी आपण 1लाख 8 हजार मतांनी विजयी झाल्याचं सांगताच अजितदादा म्हणाले, माझ्यापेक्षा जास्त मतं मिळाली तुला. या दोन्ही नेत्यांच्या या भेटीचा व्हिडिओ सध्या मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com