Narendra Modi : "जिथे-जिथे मोदींनी हात लावला, तिथे अशुभ घडलं"; कोणी केली घणाघाती टीका?

Sanjay Raut On BJP : लोकसभेतील 'इंडिया' आघाडीची ताकद दुर्लक्षित करण्यासारखी नाही. सरकारला काठावरचे बहुमत आहे, असा इशाराही राऊतांनी दिला आहे.
PM Narendra Modi
PM Narendra ModiSarkarnama

Sanjay Raut News: जिथे-जिथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हात लावला तिथे अशुभ घडलं आहे. ही अशुभाची सुरूवात मोदींच्या तिसऱ्या काळात सुरू झाली आहे. मोदींचा अमृत काळ संपला असून अशुभ काळ सुरू झाला आहे, अशी घणाघाती टीका शिवसेना ( ठाकरे गट ) खासदार संजय राऊत यांनी केली आहे.

नीट परीक्षा घोटाळा, दिल्लीतील विमानतळावरील एका टर्मिनलचा भाग कोसळला आहे, त्यावरून संजय राऊत ( Sanjay Raut ) यांनी पंतप्रधान मोदी आणि केंद्र सरकारचा समाचार घेतला आहे. ते दिल्लीत प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होते.

संजय राऊत म्हणाले, "पंतप्रधान मोदी ( Narendra Modi ) सर्व विषयांवर बोलतात आणि टीका-टिप्पणी करतात. मोदींनी पुढे येऊन नीट आणि अन्य राष्ट्रीय परीक्षांच्या घोटाळ्यावर बोलायला हवं होतं. पण, हे दिसलं नाही. नीट परीक्षा घोटाळ्याप्रकरणी शिक्षणमंत्र्यांनी राजीनामा द्यायला हवा किंवा त्यांचा राजीनामा घेऊन घरी पाठवावे."

PM Narendra Modi
Priyanka Gandhi On Om Birla : लोकसभा अध्यक्ष ओम बिर्लांवर भडकल्या प्रियांका गांधी; नेमकं कारण काय?

"आजचं कामकाज थांबवून नीट परीक्षेवर चर्चा करण्याची मागणी 'इंडिया' आघाडीनं लोकसभा आणि राज्यसभेत केली आहे. पंतप्रधान मोदींनी चर्चेला उपस्थित राहून उत्तर द्यावं. पण, सरकार आडमुठेपणानं वागत असेल, तर 'इंडिया' आघाडीची ताकद दाखवावी लागेल. लोकसभेतील 'इंडिया' आघाडीची ताकद दुर्लक्षित करण्यासारखी नाही. सरकारला काठावरचे बहुमत आहे. भाजपला स्वबळावर बहुमत नाही. त्यामुळे लोकसभा आणि राज्यसभेत सरकारला आम्ही आव्हान उभे करू," असा इशारा राऊतांनी दिला आहे.

PM Narendra Modi
Parliament Session Update : मला पाहा, फुले वाहा! संसद टीव्हीचा कॅमेरा 73 वेळा मोदींवर तर राहुल गांधींवर फक्त…

"देशातील सर्व प्रमुख विमानतळं मोदींच्या मित्रांच्या ताब्यात आहेत. भाजपला अर्थपुरवठा करणाऱ्या गुजरातच्या ठेकेदारानं देशातील विमानतळे बांधली आहेत. दिल्लीतीलच नाहीतर जबलपूरमध्ये 450 कोटी रूपये खर्च करून विमानतळ बांधण्यात आलं.

त्याचं उद्घाटन पंतप्रधान मोदींनी केलं. ते विमानतळंही कोसळलं आहे. दिल्लीच्या टर्मिनलमधील काही भाग कोसळला आहे. मोदींनी उद्घाटन केलेल्या श्री राम मंदिराला गळती लागली आहे.

त्यासह अयोध्या पाण्यात तुंबली आहे. महाराष्ट्रातील अटल सेतुला तडे गेले आहेत. जिथे-जिथे मोदींनी हात लावला तिथे अशुभ घडलं आहे. ही अशुभाची सुरूवात मोदींच्या तिसऱ्या काळात सुरू झाली आहे. मोदींचा अमृत काळ संपला असून अशुभ काळ सुरू झाला आहे," अशी टीका संजय राऊतांनी केली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com