Parliament Session Live : केंद्राच्या बजेटमध्ये काय असणार? राष्ट्रपतींनी दिले मोठे संकेत

President Droupadi Murmu Joint Address in Parliament : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडून अभिभाषणामध्ये सरकारचा रोडमॅप मांडला जात असून मागील दहा वर्षात केलेल्या कामांचा आढावाही घेत आहेत.
President Droupadi Murmu
President Droupadi MurmuSarkarnama

New Delhi : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी गुरूवारी आपल्या अभिभाषणामध्ये केंद्र सरकारच्या बजेटमध्ये नेमके काय असणार, याबाबत मोठे संकेत दिले आहेत. यावेळी बजेटमध्ये ऐतिहासिक निर्णय दिसतील, असे सूचक विधान त्यांनी केले आहे.

संसदेच्या दोन्ही सभागृहातील सदस्यांना राष्ट्रपती संबोधित करत आहेत. नवीन सरकारचा रोडमॅप त्यांच्याकडून मांडला जात आहे. मागील दहा वर्षांत केंद्र सरकारने केलेल्या कामाचेही त्यांनी तोंडभरून कौतुक केले. जगातील सर्वात मोठी निवडणूक चांगल्याप्रकारे पार पाडल्याबद्दल केंद्रीय निवडणूक आयोगाचेही त्यांनी अभिनंदन केले.

राष्ट्रपती म्हणाल्या, जनतेने निवडणुकीत सरकारवर तिसऱ्यांदा विश्वास दाखवला आहे. भारत सध्या जगातील सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था बनली आहे. 18 वी लोकसभा अनेक बाबतीत ऐतिहासिक आहे. सरकारने सेवा आणि सुसाशनाची मोहिम चालवली आहे. यावेळी बजेटमध्ये मोठ्या आर्थिक आणि सामाजिक निर्णयांसोबतच काही ऐतिहासिक निर्णयही पाहायला मिळतील.

President Droupadi Murmu
Parliament Session Live : राष्ट्रपतींच्या संसदेतील अभिभाषणाआधी ‘आप’चा मोठा निर्णय

भारताच्या वेगवान विकासासाठी सुधारणांमध्ये अधिक गती आणली जाईल, असे सांगत राष्ट्रपती म्हणाल्या, वर्ष 2021 पासून 2024 पर्यंत भारताने आठ टक्क्यांच्या वेगाने विकास केला आहे. हा विकास सामान्य स्थितीत झालेला नाही. या काळात जगात मोठी आपत्ती आली होती. भारत जगाच्या विकासात 15 टक्के योगदान देत आहे. सरकार अर्थव्यवस्थातील उत्पादन, सेवा आणि कृषी या तिन्ही स्तंभांना समान महत्व देत आहे.

President Droupadi Murmu
Sanjay Singh: आपचे खासदार संजय सिंह तब्बल वर्षभरानंतर संसदेत जाणार; उपराष्ट्रपतींचे मानले आभार!

मागील दहा वर्षात अनेक सुधारणा झाल्या असून त्याचा लाभ देशवासियांना मिळत आहे. या सुधारणांचा विरोधही केला गेला. पण या सुधारणांमुळे मोठा बदल घडला आहे. देशातील बँकिंग सेक्टर मजबूत करण्यात आले आहे. आज भारताच्या अर्थव्यवस्थेला सोपी करण्याचे माध्यम जीएसटी बनले असल्याचेही राष्ट्रपतींनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com