Parliament Winter Session : भाजप, काँग्रेसकडून खासदारांसाठी व्हीप जारी; लोकसभेत पुढील दोन दिवस महत्वाचे...

Lok Sabha Important Sessions : केंद्रीय मंत्रिमंडळाने गुरूवारी एक देश, एक निवडणूक विधेयक मंजूर केले आहे. त्यामुळे त्यावरून तर्कवितर्क लढवले जात आहेत.
Congress | BJP
Congress | BJPSarkarnama
Published on
Updated on

New Delhi : केंद्रीय मंत्रिमंडळाने गुरूवारी देशातील निवडणुकांबाबत महत्वपूर्ण निर्णय घेतला. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखालील बैठकीत एक देश, एक निवडणूक विधेयकाला मंजुरी देण्यात आली आहे. त्यामुळे देशभरात चर्चांना उधाण आले आहे. त्यातच भाजपसह काँग्रेसने सर्व खासदारांसाठी व्हीप जारी केला आहे. खासदारांना ता. 13 व 14 डिसेंबरला संसदेत उपस्थित राहण्यास सांगण्यात आले.

एक देश, एक निवडणूक विधेयकाला मंजुरी मिळाल्यानंतर हे विधेयक संसदेच्या याच अधिवेशनात सादर केले जाणार असल्याची चर्चा आहे. यापार्श्वभूमीवर दोन्ही पक्षांनी खासदारांना व्हीप जारी केल्याने तर्कवितर्क लढवले जात आहेत. असे असले तरी पुढील दोन दिवस लोकसभेत संविधानावर चर्चा होणार आहे. त्यामुळे त्यासाठी हा व्हीप जारी केल्याचे सांगितले जात आहे.

Congress | BJP
Privilege Motion : विरोधकांची लायकी काढणारे केंद्रीय मंत्री अडचणीत? राज्यसभेत महत्वाचा प्रस्ताव

काही दिवसांपूर्वी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी सर्वपक्षीय नेत्यांची बैठक घेत संविधानावर चर्चा घडवून आणण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार पुढील दोन दिवस लोकसभेत संविधानावर चर्चा होणार आहे. संविधानाच्या 75 व्या वर्षपूर्तीनिमित्त ही चर्चा होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून 14 तारखेला लोकसभेत या चर्चेला उत्तर दिले जाण्याची शक्यता आहे. यादरम्यान त्यांच्याकडून एक देश, एक निवडणुकीबाबत भाष्यही केले जाऊ शकते. त्यामुळे त्याला महत्व प्राप्त झाले आहे.

राज्यसभेत संविधानावर पुढील आठवड्यात चर्चा होण्याची शक्यता आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडून या चर्चेला उत्तर दिले जाऊ शकते. दरम्यान, लोकसभेसह महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीतही काँग्रेसकडून संविधान बदलाचा मुद्दा जोरकसपणे मांडला जात होता. त्याला पंतप्रधानांसह भाजप नेत्यांकडून प्रत्युत्तरही दिले जात होते. पण आता थेट संसदेतच सलग दोन दिवस केवळ संविधानावर चर्चा होणार असल्याने जोरदार आरोप-प्रत्यारोप होण्याची शक्यता आहे.

Congress | BJP
Arvind Kejriwal : निवडणुकीआधी केजरीवालांचा मास्टरस्ट्रोक; एकनाथ शिंदेंच्या पावलावर पाऊल

वन नेशन-वन इलेक्शन

एक देश, एक निवडणूक म्हणजेच वन नेशन, वन इलेक्शन हे विधेयक याच अधिवेशनात संसदेत मांडले जाण्याची शक्यता आहे. या विधेयकाला विरोधकांकडून जोरदार विरोध होऊ शकतो. संविधानावरील चर्चेदरम्यानही हा मुद्दा चर्चेला येऊ शकतो. त्यामुळे सरकार हे विधेयक याच अधिवेशनात आणून त्या मंजुरी मिळवणार का, याबाबत उत्सुकता वाढली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com