Privilege Motion : विरोधकांची लायकी काढणारे केंद्रीय मंत्री अडचणीत? राज्यसभेत महत्वाचा प्रस्ताव

Rajya Sabha Winter Session : राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड यांच्याविरोधात विरोधकांनी अविश्वास प्रस्ताव मांडला आहे. त्यावर बोलताना किरण रिजिजू भडकले होते.
Kiren Rijiju, Sagarika Ghose
Kiren Rijiju, Sagarika GhoseSarkarnama
Published on
Updated on

New Delhi : संसदेच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान राज्यसभेत गुरूवारीही मोठा गदारोळ झाला. बुधवारीही विरोधक आणि सत्ताधारी आमनेसामने उभे ठाकले होते. यादरम्यान बोलताना केंद्रीय मंत्री किरण रिजिजू यांनी विरोधकांची लायकी काढली होती. त्यावरून आता विरोधक आक्रमक झाले असून त्यांनी मोठं पाऊल उचललं आहे.

विरोधकांनी राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड यांच्याविरोधात अविश्वास प्रस्ताव आणला आहे. मंगळवारी हा प्रस्ताव राज्यसभेच्या सचिवालयात देण्यात आला. त्यावरून बुधवाऱी किरण रिजिजू चांगलेच भडकले होते. त्यांनी थेट विरोधकांना उद्देशून तुम्ही या सभागृहात बसण्यास लायक नसल्याचे विधान केले होते. त्यानंतर विरोधक चांगलेच संतापले होते.

Kiren Rijiju, Sagarika Ghose
Arvind Kejriwal : निवडणुकीआधी केजरीवालांचा मास्टरस्ट्रोक; एकनाथ शिंदेंच्या पावलावर पाऊल

केंद्रीय मंत्री रिजिजू यांच्या या विधानावरून विरोधकांनी आता त्यांच्याविरोधात राज्यसभेत विशेषाधिकार भंगाची नोटीस दाखल केला आहे. त्यावर जवळपास 60 खासदारांच्या सह्या असल्याचे वृत्त पीटीआयने दिले आहे. तृणमूल काँग्रेसच्या खासदार सागरिका घोष यांनी ही नोटीस दिली आहे.

मीडियाशी बोलताना घोष म्हणाल्या, संसदीय कार्य मंत्री किरण रिजिजू हे संसदेचे कामकाज व्यवस्थितपणे चालवे यासाठी प्रयत्न करण्याऐवजी ते सातत्याने विरोधकांना अपमानित करत आहेत. संसदेत आणि संसदेबाहेरही ते सदस्यांविषयी अपमानजनक बोलत आहेत. त्यांच्या पदाचा हा गैरवापर आहे. विरोधकांबाबत ते असंसदीय भाषेचा वापर करत असल्याचे नोटिशीत म्हटले आहे.

Kiren Rijiju, Sagarika Ghose
One Nation One Election : मोठी बातमी! ‘एक देश, एक निवडणूक’ विधेयकाला कॅबिनेटची मंजुरी... आता पुढे काय?

काय म्हणाले होते रिजिजू?

भारताच्या इतिहासात 72 वर्षानंतर एक शेतकऱ्याचा मुलगा उपराष्ट्रपती पदावर पोहचून या देशाची सेवा करत आहे. राज्यसभेचे सभापती म्हणून त्यांनी प्रतिष्ठा वाढवणारे काम केले आहे. पण विरोधक सुरूवातीपासून अध्यक्षांची प्रतिष्ठा ठेवत नाही. उपराष्ट्रपतींचे नाव घेत त्यांच्यावर नको ते आरोप करत आहेत. तुम्ही या सभागृहाचे सदस्य होण्याच्या लायक नाही, असे म्हणत रिजिजू यांनी विरोधी सदस्यांची लायकी काढली होती.

विशेषाधिकार भंग म्हणजे काय?

सभागृहातील एखाद्या सदस्यांविषयी खोटे आरोप केले किंवा असंसदीय भाषेचा वापर केल्यास संबंधित सदस्यांच्या विशेषाधिकाराचा भंग होतो. त्याआधार विशेषाधिकार भंगाची नोटीस दिली जाऊ शकते. या नोटिशीच्या आधारे कारवाईही होऊ शकते. त्यासाठी एक स्वतंत्र विशेषाधिकार समिती असते. ही नोटीस फेटाळायची की समितीकडे पाठवायची, याचा अधिकार सभापतींना असतो.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com