
New Delhi News: लोकसभेच्या हिवाळी अधिवेशनात गुरूवारी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी रस्ते अपघातावरून लोकसभेत चिंता व्यक्त केली. देशातील अपघात कमी करण्याचे टार्गेट ठरवूनही ते वाढल्याची नाराजीही गडकरी यांनी यावेळी व्यक्त केली. याबाबतीत जगात सर्वात वाईट रेकॉर्ड भारताचे असल्याचे गडकरी म्हणाले.
लोकसभेत गुरूवारी खासदार गुरमीत सिंह मीत हेयर यांनी याबाबत प्रश्न उपस्थित केला होता. जपान, स्वीडन, ऑस्ट्रेलिया सारख्या विकसित देशांनी रस्ते अपघातात शुन्य मृत्यूची टार्गेट ठेवले आहे. आपल्या सरकारनेही काही टार्गेट निश्चित केले आहे का, असा सवाल त्यांनी केला होता. त्याला उत्तर देताना गडकरी म्हणाले, मी त्यांची भावना समजू शकतो. मी 11 वर्षांपासून या खात्यात आहे. स्वीडनमध्ये अपघातात शुन्य मृत्यू होता. अनेक देशांना रेकॉर्ड केले आहे.
मी जागतिक परिषदेत जातो तेव्हा तोंड लपवतो, कारण सर्वात वाईट रेकॉर्ड जगात आपल्या देशाचा आहे. मी असे म्हटले होते की, 2024 संपण्यापूर्वी 50 टक्के मृत्यू आणि अपघात आम्ही कमी करू. पण कमी तर झाले नाहीत, उलट वाढले. हा एकमेव मुद्दा असा जिथे आमच्या विभागाला यश मिळाले नाही. त्याची अनेक कारणेही आहेत, असे गडकरी यांनी सांगितले.
जोपर्यंत समाजाचे सहकार्य़ मिळणार नाही, कायद्याचा सन्मान होणार नाही आणि लोकांचे वागणे सुधारणार नाही, तोपर्यंत हे मुश्किल आहे. हा चिंताजनक मुद्दा आहे. आम्ही पुन्हा वेगाने कामाला लागलो आहोत, असेही गडकरींनी स्पष्ट केले. देशात 18 लाख प्रशिक्षित चालकांची कमतरता असल्याचेही गडकरींनी सांगितले.
सहजपणे वाहन चालवण्याचा परवाना मिळणारा देश म्हणून भारत जगात क्रमांक एकवर असल्याचे गडकरी यांनी सांगितले. आम्ही त्यात सुधारणा करत आहोत. त्यासाठी चालक प्रशिक्षण आणि फिटनेस केंद्र प्रत्येक जिल्हा आणि तालुका स्तरावर उभे केली जाणार असल्याचे ठरवले आहे. देशात 1 लाख 78 हजार लोकांचा मृत्यू असून त्यापैकी 60 टक्के लोक 18 ते 30 वयोगटातील आहेत. अजूनही कायद्याविषयी लोकांच्या मनात भीती नाही. खासदारांनी त्यासाठी जिल्हा स्तरावरही प्रयत्न करावेत, असे आवाहन यावेळी गडकरींनी केले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.