Bharat Gogawale : मंत्रिपदासाठी फिल्डिंग लावलेले भरत गोगावले महाराष्ट्राला लवकरच देणार ‘जोर का झटका’

Bharat Gogawale Preparing for Ministerial Position: भरत गोगावले हे एसटी महामंडळाचे अध्यक्ष असून महायुती सरकारमध्ये मंत्रिपद मिळण्याची अपेक्षा त्यांना आहे.
Bharat Gogawale
Bharat GogawaleSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News: महायुती सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार पुढील दोन दिवसांत होण्याची दाट शक्यता आहे. मागील अडीच वर्षांमध्ये मंत्रिपदाची संधी हुकलेले शिवसेना आमदार भरत गोगावले यांना यावेळी तरी पद मिळेल, अशी आशा आहे. त्यासाठी त्यांनी जोरदार फिल्डिंग लावल्याचीही चर्चा आहे. पण मंत्रिपद मिळो ना मिळो, त्यांनी महाराष्ट्राला झटका देण्याचा निर्णय घेतला आहे.

गोगावले यांच्याकडे सध्या एसटी महामंडळाचे अध्यक्षपद आहे. काही महिन्यांपूर्वी त्यांच्याकडे हे पद आले आहे. त्यांनी आता एसटीची तिकीट भाडेवाढ करण्याचा निर्णय घेतला असून तसा प्रस्ताव लवकरच शासनाला सादर केला जाणार आहे. कर्मचाऱ्यांचे वाढते वेतन, इंधन दरवाढ तसेच इतर सुट्ट्या भागांची दरवाढ झाल्याने तिकीट भाडेवाढ करण्याचा प्रस्ताव दिला जाणार असल्याचे गोगावले यांनी स्पष्ट केले आहे. एसटीने दररोज सुमारे 55 लाख प्रवाशांना सेवा दिली जात आहे.

Bharat Gogawale
Sharad Pawar Birthday : शरद पवारांच्या निवासस्थानी जाऊन अजितदादांनी दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा तर PM मोदींकडून दीर्घायुष्यासाठी प्रार्थना!

राज्यातील प्रवाशांना लवकरच भाडेवाढीला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे. तसे संकेत गोगावले यांनी दिले आहेत. महामंडळाचा प्रस्ताव राज्य सरकारकडे गेल्यानंतर त्यावर शिक्कामोर्तब होणार की प्रवाशांना दिलासा दिला जाणार, हे लवकरच स्पष्ट होईल. मागील काही वर्षांपासून भाडेवाढ झाली नसल्याने महामंडळ भाडेवाढीसाठी आग्रही आहे.

दरम्यान, भंडारा व नाशिक येथे झालेल्या एसटी बसच्या अपघाताबरोबरच नुकत्याच बेस्ट चालकांकडून घडलेल्या अपघाताच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर भरत गोगावले यांनी महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बुधवारी बैठक घेतली. बैठकीत प्रवाशांना सुरक्षित सेवा देण्याच्या उद्देशाने चालक प्रशिक्षण, चालकांची निवड चाचणी, त्यांचे मानसिक आरोग्य याबरोबरच तांत्रिकदृष्ट्या निर्दोष वाहन उपलब्ध करून देण्याबाबत चर्चा करण्यात आली.

Bharat Gogawale
Mamata Banerjee : 'ममता बॅनर्जींकडे I.N.D.I.A आघाडीचे नेतृत्व दिल्यास कोणतीही अडचण नाही'; काँग्रेस नेत्याचं वक्तव्य!

बससंख्या अपुरी

महामंडळाकडे सुमारे 14 हजार बस असून प्रवाशांसाठी त्या अपुऱ्या पडत आहेत. अनेक बस जुन्या झाल्या आहेत. याचा विचार करून निविदा पात्र संस्थांनी नवीन बसचा वेळेत पुरवठा करणे आवश्यक होते. मात्र, या संस्था बस पुरविण्याबद्दल सक्षम का नाहीत? याचा पाठपुरावा करून त्यांना कारणे दाखवा नोटीस पाठविण्याच्या सूचना गोगावले यांनी प्रशासनाला दिल्या.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com