Jyotiraditya Scindia : तुम्ही लेडी किलर आहात, सुंदर दिसता..! लोकसभेत ज्योतिरादित्य शिंदे अन् खासदारांमध्ये शाब्दिक चकमक...

Parliament Winter Session Kalyan Banerjee Lok Sabha : तृणमूल काँग्रेसचे खासदार कल्याण बॅनर्जी यांनी बुधवारी लोकसभेत ज्योतिरादित्य शिंदेंवर वैयक्तिक टीका केली.
Jyotiraditya Scindia
Jyotiraditya ScindiaSarkarnama
Published on
Updated on

New Delhi : संसदेच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान बुधवारी लोकसभेत केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे आणि तृणमूल काँग्रेसचे खासदार कल्याण बॅनर्जी यांच्यामध्ये चांगलीच शाब्दिक चकमक उडाली. बॅनर्जी यांनी शिंदेंना उद्देशून लेडी किलर असे म्हटले. त्यावर शिंदेंनी जोरदार आक्षेप घेतला. त्यानंतर सभागृहात प्रचंड गदारोळ झाल्यानंतर काही काळासाठी कामकाज तहकूब करावे लागले.

आपत्ती व्यवस्थापन (सुधारित) विधेयकावर चर्चेदरम्यान कल्याण बॅनर्जी यांनी सत्ताधारी पक्षावर जोरदार टीका केली. यावेळी त्यांना ज्योतिरादित्य शिंदे यांनीही प्रत्युत्तर दिले. त्यावेळी बॅनर्जी यांनी शिंदे यांना उद्देशून तुम्ही खूप सुंदर दिसता, तुमच्यावर चित्रपटही होऊ शकतो, तुम्ही मोठ्या घराण्यातून आला म्हणून इतरांवर छोटे समजणे, हे ठीक नाही, असे म्हटले. कुणाच्या चेहऱ्यावर खळबळ आणि कुणाच्या चेहऱ्या हास्य आहे, हे दिसतेच आहे, असे प्रत्युत्तर शिंदे यांनी दिले.

Jyotiraditya Scindia
Jagdeep Dhankhar : RSS चे एकलव्य... संसद नव्हे सर्कस चालवतात, हेडमास्तरांप्रमाणे नेत्यांची शाळा घेतात! विरोधक संतापले...

बॅनर्जी एवढ्यावर थांबले नाहीत. तुम्ही सुंदर आहात म्हणून सगळं आहे का, शिंदे कुटुंबातील आहात म्हणून राजा आहात का, काय विचार करता तुम्ही?, असेही ते म्हणाले. त्यावर शिंदे यांनी आक्षेप घेतला. बॅनर्जी यांनी वैयक्तिक विधान केले आहे. माझे नाव ज्योतिरादित्य शिंदे आहे. या देशाच्या लोकशाही प्रणालीतील मी एक नागरिक आहे. जनतेचे आशीर्वाद आणि माझ्या कष्टाने इथपर्यंत पोहचलो आहे. ते जर माझ्या कुटुंबाला कलंक लावण्याचा प्रयत्न करणार असतील तर माझ्याकडूनही सहन होणार आहे, असा इशारा शिंदेंनी दिला.

त्यानंतर अध्यक्ष ओम बिर्ला यांनी वैयक्तिक टीका-टिप्पणी करू नये, असे आवाहन केले. पण बॅनर्जी यांनी पुन्हा शिंदे यांनीच याची सुरूवात केल्याचे सांगत चेहरा सुंदर आहे म्हणून काहीही बोलणार का, असा सवाल केला. तुम्ही खूप सुंदर आहात, लेडी किलर आहात, हे आम्हाला माहिती आहे. आम्ही तुमच्यासारखे सुंदर नाही, तुम्ही महाराजाच्या कुटुंबातून आला म्हणून आम्हाला काहीही बोलणार का, असेही ते म्हणाले.   

Jyotiraditya Scindia
Rahul Gandhi Video : राहुल गांधींची संसदेत ‘गांधीगिरी’; राजनाथ सिंह यांना दिले गुलाब अन्...

बॅनर्जी यांच्या या विधानांवर शिंदे चांगलेच संतापले. ते इथे येऊन वैयक्तिक विधाने करत असतील तर आम्हीही सहन करणार नाही. त्यांना बोलू देणार नाही. तुम्ही स्वत:ला काय समजता. इथे येऊन काहीही बोलणार का, हे सहन करणार नाही, अशा शब्दांत शिंदे यांनी सुनावले. त्यानंतर गदारोळ वाढत गेल्याने अध्यक्ष बिर्ला यांनी लोकसभेचे कामकाज 30 मिनिटांसाठी स्थगित केले.

सभागृहाचे कामकाज पुन्हा सुरू झाल्यानंतर बॅनर्जी यांचा सूर बदललेला दिसला. आपल्या विधानांबद्दल त्यांनी माफी मागितली. त्यावर शिंदे यांनीही प्रत्युत्तर दिले. आपण इथे देशाच्या विकासाच्या मुद्द्यावर बोलण्यासाठी इथे येतो. तुम्ही आमची धोरणांवर टीका करा. पण वैयक्तिक विधाने केली तर त्यावर ऐकून घेण्यासाठीही तयार राहा. त्यांनी माफी मागितली असली तरी त्याचा स्वीकार करणार नाही. कारण त्यांनी माझ्यावर वैयक्तिक हल्ला केला असून देशातील महिलांचाही अपमान केला आहे, असे म्हणत शिंदे यांनी आपली नाराजी व्यक्त केली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com