Narendra Modi : मोदींचा विश्वनाथन आनंद यांच्याशी सामना अन् बुध्दिबळात ऐतिहासिक मेडल... काय आहे कनेक्शन?

Vishwanathan Anand Chess Olympiad Gold Medal : बुध्दिबळ ऑलिम्पियाडमध्ये भारताला तब्बल 68 वर्षांनंतर गोल्ड मेडल मिळाले आहे.
Narendra Modi, Chess
Narendra Modi, ChessSarkarnama
Published on
Updated on

New Delhi : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ग्रँडमास्टर विश्वनाथन आनंद यांच्यात बुध्दिबळाचा सामना रंगल्याचा एक फोटो सोशल मीडियात व्हायरल होत आहे. तर दुसरीकडे भारताने हंगेरीत झालेल्या बुध्दिबळ ऑलिम्पियाडमध्ये ऐतिहासिक गोल्ड मेडल मिळवल्याने खेळाडूंवर कौतुकाचा वर्षाव होत आहे. या दोन्ही घटनांचे नेमकं कनेक्शन काय आहे, याबाबत मोदींचे चाहते आणि बुध्दिबळ प्रेमींची उत्सुकता नक्कीच वाढली असेल.

पंतप्रधान मोदी आणि विश्वनाथन आनंद यांचा बुध्दिबळ खेळत असल्याचा हा फोटो खूप जुना आहे. पण गुरूवारी मोदींनी ऑलिम्पियाडमध्ये गोल्ड मेडल मिळवलेल्या टीममधील खेळाडूंशी दिलखुलास संवाद साधला. यापाश्वभूमीवर हा फोटो मोदी अर्काइव्हवरून व्हायरल करण्यात आला आहे.

Narendra Modi, Chess
Hindu Temple Vandalized : हिंदूंनो परत जा! मोदींची पाठ फिरताच अमेरिकेत हिंदू मंदिरावर हल्ला

फोटो शेअर करताना मोदी अर्काइव्ह या ‘एक्स’ हँडलवर मोदींच्या ‘बुध्दिबळ हा असा एक खेळ आहे, जो जीवनातील शंभऱ दु:ख दूर करतो’ या विधानाचा उल्लेख करण्यात आला आहे. मोदी हे बुध्दिबळाचे चाहते आहेत. या खेळामुळे तणाव दूर होतो आणि जीवनात नवी दिशा मिळते, असे मोदी मानत असल्याचे या पोस्टमध्ये म्हटले आहे.

मोदी हे गुजरातचे मुख्यमंत्री असताना 2009 मध्ये अहमदाबाद जिल्ह्यातील शाळांमध्ये बुध्दिबळ हा विषय बंधनकारक करण्यात आला होता. त्यानंतर संपूर्ण राज्यात त्याची अंमलबजावणी करण्याचे ठरवले होते. याचा परिणाम असा झाला की, गुजरातमधील शाळांमध्ये एक विषय म्हणून त्याचा समावेश करण्यात आला, असेही मोदी अर्काइव्हच्या पोस्टमध्ये म्हटले आहे.

Narendra Modi, Chess
Rahul Gandhi : राहुल गांधी भारतीय नागरिक आहेत की नाही? हायकोर्टाची थेट गृह मंत्रालयाला नोटीस

नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण गुजरातमध्ये बुध्दिबळाला लोकप्रिय करण्याचे काम केले. त्यासाठी त्यांनी महोत्सवाचे आयोजन केले होते. 2009 मध्ये एकाच ठिकाणी 20 हजार बुध्दिबळपटू आले होते. यावेळी गुजरातमधील केळाडूंनी गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये आपले नाव कोरले. या महोत्सवात विश्वनाथन आनंद यांचाही सहभाग होता, अशी आठवण सांगण्यात आली.

महोत्सवामध्ये विश्वनाथन आनंद यांनी तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्या प्रयत्नांचे कौतुक केले होते. याच महोत्सवामध्ये दोघांनी एकमेकांविरुध्द बुध्दिबळ खेळण्याचा आनंद लुटला होता. भारताला ऐतिहासिक गोल्ड मेडल मिळाल्यानंतर मोदी अर्काइव्हवरून हा फोटो व्हायरल करण्यात आला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com