Shiv Sena News : पिंपरी-चिंचवडमधील ठाकरे गटाचा नेता शिवसेनेच्या गळाला

Pimpri Chinchwad Shiv Sena Chief: अॅड. वैभव थोरात यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे.
Shivsena Uddhav Thackeray News
Shivsena Uddhav Thackeray NewsSarkarnama

Vaibhav Thorat Joined Shiv Sena News : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाकरे गटाचे पक्षप्रमुख, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आणखी एक मोठा धक्का दिला आहे. ठाकरे गटाच्या एका संपर्कप्रमुखाने शिवसेनेत (शिंदे गटात) प्रवेश केला आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत पिंपरी-चिंचवडचे संपर्कप्रमुख व सिनेट सदस्य, तसेच युवा सेनेचे विस्तारक अॅड.वैभव थोरात यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. pimpri chinchwad communication chief vaibhav thorat joined shiv sena cm eknath shinde)

अँड वैभव थोरात यांच्या शिवसेना पक्षप्रवेशाच्या वेळी उद्धव बाळासाहेब ठाकरे संघटनेचे व प्रशासकीय कामातील अनुभवी समजले जाणारे मारूती साळुंखे, मुंबई महानगरपालिकेचे माजी स्थायी समिती सभापती यशवंत जाधव हे उपस्थित होते.

Shivsena Uddhav Thackeray News
Maharashtra politics : मुख्यमंत्री होणे हेच अजितदादांचे अंतिम ध्येय ; सुळेंना नेतृत्व मिळाले तर वडिलांची उंची गाठण्यासाठी..

मारूती साळुंखे हे ठाकरे गटाचे खासदार अनिल देसाई यांच्या जवळचे मानले जातात. शिवसेना संघटना बांधण्यात व प्रशासकीय कामाचा मोठा अनुभव मारूती साळुंखे यांना आहे. ठाकरे गटाचे खासदार अनिल देसाई यांचे निकटवर्तीय म्हणून मारूती साळुंखे ओळखले जातात.

दरम्यान, भाजपची जंबो प्रदेश कार्यकारिणी नुकतीच जाहीर झाली आहे. त्यात पिंपरी-चिंचवडला झुकते माप देण्यात आले आहे.मात्र,पक्षात नुकताच प्रवेश झालेल्यांना या कार्यकारिणीत स्थान देण्यात आल्याने शहरासह राज्यभरातील भाजपच्या जुन्या निष्ठावंत पदाधिकारी,कार्यकर्त्यांत नाराजीचा सूर उमटला आहे. (Political Web Stories)

Shivsena Uddhav Thackeray News
Rashtrawadi New President: NCP च्या अध्यक्षाबाबत जयंत पाटील म्हणाले, "दिल्लीत माझी ओळख नाही.."

महिलांना तुलनेने कमी संधी या नव्या कार्यकारिणीत देण्यात आली आहे. तसेच एक पद,एक व्यक्ती या तत्वालाही हरताळ फासला गेल्याचे दिसून आले आहे. कारण या नव्या नियुक्तीतून काहींकडे दोन-दोन पदे आली आहेत.त्यामुळे त्यांचा एका पदाचा राजीनामा पक्ष घेणार का,याकडे आता लक्ष लागले आहे. (Political Short Videos)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com