शेतकऱ्यांच्या दबावापुढे सरकार झुकले : सोयाबीन पेंडेची आयात नाही; उत्पादकांची दिवाळी

जुन-जुलै २०२१ मध्ये सोयाबीनचा भाव ११ हजार रुपये प्रतिक्विंटलपर्यंत गेला होता.
soybean
soybeansarkarnama

नवी दिल्ली : भारतातील पोल्ट्री उद्योगासाठी खाद्य म्हणून वापरली जाणारी सोया पेंड आयात (soybean meal) करण्याचा कोणताही विचार नाही, अशी स्पष्टोक्ती केंद्र सरकारने दिली आहे. यामुळे शेतकऱ्यांना (Farmers) मोठा दिलासा मिळाला आहे. सोया पेंड आयात करण्याचा कोणताही प्रस्ताव केंद्र सरकारकडे नसल्याचे वाणिज्य मंत्री पीयूष गोयल (Piyush Goyal) यांनी जाहीर केले.

soybean
पगारवाढीमुळे एसटीच्या संपात उभी फूट; आजपासून नवीन वाढ लागू!

राज्याच्या कृषिमूल्य आयोगाचे माजी अध्यक्ष पाशा पटेल यांनी गोयल यांची भेट घेतली होती. त्यानंतर गोयल यांनी ट्वीट करत हा निर्णय जाहीर केला. जुन-जुलै २०२१ मध्ये सोयाबीनचा भाव ११ हजार रुपये प्रतिक्विंटलपर्यंत गेला होता. यामुळे पोल्ट्री उद्योग मोठ्या अडचणीत सापला होता. पोल्टी उद्योगासाठी खाद्य म्हणून सोयाबीनचा मोठ्या प्रमाणात वापर होतो. या भाव वाढीमुळे पोल्ट्री उद्योगांनी सोया पेंड आयात करण्याची मागणी केंद्र सरकारकडे केली होती. या मागणीनंतर केंद्र सरकार ऐन सोयाबीन हंगामाच्या तोंडावर १२ लाख टन जीएम सोया पेंड आयात करणार असल्याचे सांगितले जात होते. मात्र, यावर शेतकरी संघटनांनी मोठ्या प्रमाणात आवाज उठवत आंदोलन करण्याचा इशारा दिला होता.

तसेच लोकसभेच्या हिवाळी अधिवेशनातही (Winter session) हा मुद्दा चांगलाच गाजला. शेतकरी संघटनांच्या वाढत्या दबावामुळे केंद्र सरकारने सोया पेंड आयात करण्याचा कोणताही प्रस्ताव नसल्याचे जाहीर केले आहे. या निर्णयामुळे सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. सोया पेंड आयात करण्याच्या चर्चेमुळे सोयाबीनचे दर कोसळले होते. ११ हजारांवर असलेले दर ४ हजार ८०० ते ५ हजारांवर आले होते. अतिवृष्टीमुळे आणि कोसळणारे दर पहाता शेतकरी चिंतेत होता. दर वाढतील या आशेवर ७० टक्के शेतकऱ्यांनी सोयाबीनचे खळे करुन माल घरातच साठवून ठेवला आहे.

soybean
अखेर अजित पवारांनी बाबाजानी दुर्राणींना भेटीला बोलावले..

सोयाबीनचे दर वाढणार अशी शक्यता व्यक्त केली जात होती. त्यामुळे शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात सोयाबीन साठवून ठेवले आहे. सध्या सोयाबीनचा भाव ७ हजार रुपये पर्यंत गेला आहे. मात्र, केंद्र सरकारच्या निर्णयामुळे हे दर वाढणार असल्याचे सांगितले जात आहे. सोयाबीनला १० हजार रुपयापर्यंत भाव मिळेल असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com