Gajanan Kirtikar Shiv Sena : '...त्यानंतरच शिवसेना गोव्यात निवडणूक लढवण्याचा विचार करणार'; गजानन कीर्तीकरांचं विधान!

Shiv Sena Goa camp : 'शिवसेना महाराष्ट्रात भाजप युती सरकारचा घटक असली, तरी गोव्यात आगामी निवडणुकीत...' असं देखील किर्तीकर यांनी सांगितलं आहे.
Gajanan Kirtikar
Gajanan KirtikarSarkarnama
Published on
Updated on

Goa politics latest : शिवसेनेचे संपर्क नेते आणि माजी खासदार गजानन कीर्तीकर यांनी गोव्यात शिवसेनेच्या शिबिरात बोलताना, एकनाथ शिंदे यांची शिवसेना अगोदर गोव्यातील बेकायदा गोष्टीविरोधात जनआंदोलन उभारून वातावरण निर्मिती करणार आणि नंतरच निवडणूक लढविण्याबाबत विचार करणार. असे स्पष्ट केले.

येत्या तीन महिन्यात गोव्यात एक लाख शिवसैनिकांची सदस्य नोंदणी करण्याचे उद्धीष्ट ठेवण्यात आले आहे. असेही कीर्तिकर यांनी स्पष्ट केले. एकनाथ शिंदे यांची शिवसेना ही बाळासाहेबांच्या विचारांची आणि लोकांसाठी संघर्ष करणारी शिवसेना आहे. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेची महाराष्ट्रातील सध्याची गत पाहता, गोव्यातील जनता शिंदे यांच्या शिवसेनेला स्वीकारतील. असा विश्वासही गजानन कीर्तिकर(Gajanan Kirtikar) यांनी व्यक्त केला.

Gajanan Kirtikar
Mohan Yadav government announcement : मध्यप्रदेशात धर्मांतर करवून घेणाऱ्यांना आता होणार फाशी ; मोहन यादव सरकारची मोठी घोषणा!

महाराष्ट्रातील एकनाथ शिंदे(Eknath Shinde) यांच्या शिवसेनेने गोव्यात पाऊल ठेवले असून, शनिवारी डिचोलीतील नानोडे येथे गजानन कीर्तिकर यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेनेचे राज्यव्यापी कार्यकर्ता शिबीर पार पडले. या राज्यव्यापी शिबिरापूर्वी गजानन कीर्तिकर यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी शिवसेनेचे गोवा राज्यसंपर्क प्रमुख सुभाष सावंत, स्मिता सावंत, शिवसेनेचे माजी गोवा राज्य प्रमुख उपेंद्र गावकर आदी उपस्थित होते.

जागतिक पर्यटन केंद्र असलेल्या गोमंतभूमीत खनिज व्यवसाय आदी अनेक बेकायदा गोष्टी घडत आहेत. रोजगार आदीबाबतीत गोमंतकीयांवर अन्याय होत आहे. या अन्यायाविरोधात शिवसेना(Shivsena) संघर्ष करणार. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे कार्य तळागाळात नेवून गोव्यात शिवसेनेचे कार्य वाढवून शिवसेनेचा विस्तार करण्यात येईल. असे गजानन कीर्तीकर यांनी स्पष्ट केले.

Gajanan Kirtikar
Gaurav Ahuja arrested : पुण्यात भरदिवसा रस्त्यावर अश्लील चाळे करून फरार झालेल्या गौरव आहुजाला अटक ; माज उतरल्यावर आता म्हणातोय, की...!

शिंदे यांची शिवसेना महाराष्ट्रात भाजप(BJP) युती सरकारचा घटक असली, तरी गोव्यात आगामी निवडणुकीत भाजपबरोबर युती करण्याबाबतीत विचार झालेला नाही. अगोदर शिवसेना गोव्यात मजबूत करण्यावर लक्ष केंद्रित करण्यात येईल. यापुर्वी शिवसेनेमुळेच गोव्यात भाजपचे सरकार सत्तेवर आले आणि मनोहर पर्रीकर यांच्यासारखा मुख्यमंत्री गोव्याला मिळाला. असे गजानन कीर्तिकर यांनी सांगितले. यानंतर नानोडे येथे पार पडलेल्या शिवसेना शिबिरात गजानन कीर्तीकर आणि सुभाष सावंत यांनी शिवसैनिकांना मार्गदर्शन केले. उपेंद्र गावकर यांनीही विचार व्यक्त केले.

(२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता का्ॅमस्कोअरमध्ये नंबर १. डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातली नवी झेप)

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com