Jagdeep Dhankhar : उपराष्ट्रपती धनखड यांची प्रकृती बिघडली, एम्स रुग्णालयात केलं दाखल

Vice President Jagdeep Dhankhar Health Update : उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांची प्रकृती अचानक बिघडली. रविवारी (ता.9) सकाळी त्यांना अस्वस्थता आणि छातीत दुखण्याची तक्रार सुरू झाली. यानंतर त्यांना दिल्ली एम्समध्ये दाखल करण्यात आले आहे.
Vice President Jagdeep Dhankhar
Vice President Jagdeep Dhankharsarkarnama
Published on
Updated on

Navi Delhi News : देशाचे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांना एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. आज (ता.9) त्यांनी अस्वस्थता आणि छातीत दुखण्याची तक्रार केल्यानंतर त्यांना तातडीने दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याबाबतची माहिती पीटीआयने दिली असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

73 वर्षीय धनखड यांना पहाटे अस्वस्थता आणि छातीत दुखू लागल्याने दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांना पहाटे 2 वाजता रुग्णालयात हालवण्यात आले असून एम्समधील कार्डिओलॉजी विभागात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या विभागाचे प्रमुख डॉ. राजीव नारंग यांच्या देखरेखीखाली क्रिटिकल केअर युनिटमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. सध्या धनखड यांची प्रकृती सध्या स्थिर असून डॉक्टरांच्या निरिक्षणाखाली त्यांना ठेवण्यात आले आहेत.

जेपी नड्डांकडून प्रकृतीची चौकशी

धनखड यांच्यावर दिल्लीतील एम्स रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांची सध्या प्रकृती स्थिर असून त्यांना निरिक्षणाखाली ठेवण्यात आले आहे. यादरम्यान केंद्रीय मंत्री आणि ज्येष्ठ भाजप नेते जेपी नड्डा यांनी त्यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी एम्सला भेट दिली. हृदयरोग विभागाचे प्रमुख डॉ. राजीव नारंग यांच्या देखरेखीखाली धनखड यांच्यावर उपचार सुरू आहेत.

Vice President Jagdeep Dhankhar
Jagdeep Dhankhar : सीबीआय संचालक अन् निवडणूक आयुक्तांच्या निवडीत सरन्यायाधीश कशाला हवेत? उपराष्ट्रपती धनखड यांच्या प्रश्नाचे पडसाद

१४ वे उपराष्ट्रपती

जगदीप धनखड सध्या उपराष्ट्रपती असून त्यांनी 11 ऑगस्ट 2022 रोजी भारताचे 14 वे उपराष्ट्रपती म्हणून शपथ घेतली. त्यांचा जन्म 18 जुलै 1951 रोजी राजस्थानातील हनुमानगड जिल्ह्यातील कालीबंगा येथे झाला. ते भारतीय जनता पक्षाशी संबंधित असून यापूर्वी पश्चिम बंगालचे राज्यपाल म्हणून काम पाहिले आहे. उपराष्ट्रपती धनखड हे एक वकील असून ते अनेक वर्षांपासून भारतीय संसदेचे सदस्य आहेत.

(२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता कॉमस्कोअरमध्ये नंबर १. डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातली नवी झेप)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com