Walmik Karad : काय सांगता? 'या' सरकारी योजनेचं महत्त्वाचं पद वाल्मिक कराडकडे...; 14 गुन्हे दाखल असतानाही मुंडेंनी....

Walmik Karad appointed for government scheme post on recommendation dhananjay munde: वाल्मिक कराडला अटक होण्यापूर्वी त्याच्यावर 14 गुन्हे दाखल असतानाही त्याची एका सरकारी समितीवर नियुक्ती करण्यात आली असल्याची माहिती समोर येत आहे.
Walmik Karad | Dhananjay Munde
Walmik Karad | Dhananjay MundeSarkarnama
Published on
Updated on

सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर या हत्येसंबधी खंडणीच्या गुन्ह्यात अटक करण्यात आलेल्या वाल्मिक कराड याचे कारनामे दररोज बाहेर येत आहे. वाल्मिक कराड याची चौकशी सीआयडी (CID) करीत आहे.

या प्रकरणात नवीन माहिती समोर येत आहे. या प्रकरणात नवी अपडेट समोर येत आहे. वाल्मिक कराडला अटक होण्यापूर्वी त्याच्यावर 14 गुन्हे दाखल असतानाही त्याची एका सरकारी समितीवर नियुक्ती करण्यात आली असल्याची माहिती समोर येत आहे.

Walmik Karad | Dhananjay Munde
Ganesh Naik: ताडोबाच्या 'कारभारा'वर ED छापा; वनमंत्री म्हणाले, 'काहीतरी काळेबेरे...'

एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी वाल्मिक कराड याची नियुक्ती केली होती. लोकसभा निवडणुकीनंतर तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची महत्वाकांशी लाडकी बहीण योजनेच्या परळी मतदारसंघ समिती अध्यक्षपदी वाल्मिक कराड यांनी नियुक्ती करण्यात आली होती.

बीडचे तत्कालीन पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या शिफारशीवरून वाल्मिक कराडला शासकीय समितीवर घेण्यात आलं होतं. विशेष म्हणजे एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना लोकसभा निवडणुकीनंतर राज्य सरकारने सुरु केलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेशीसंबंधित काम वाल्मिक कराडला देण्यात आलं होतं. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या परळी मतदारसंघाच्या समिती अध्यक्षपदी वाल्मिक कराड होता. याबाबत आजही वाल्मिक कराडच्या फेसबुक पेजवर उल्लेख आहे.

Walmik Karad | Dhananjay Munde
Pune Police : वेश्याव्यवसाय करणाऱ्या महिलांची तक्रार घेऊन आमदार पोहोचले पोलीस आयुक्तालयात! नेमकं काय घडलं...

त्याच्यावर 14 गुन्हे दाखल असतानाही त्याची सरकारी समितीवर नियुक्ती कशी झाली, अशी विचारणा आता करण्यात येत आहे. यामुळे नव्या वादाचा तोंड फुटलं आहे. बीड जिल्हा नियोजन समितीचा तो सदस्य होता.

गुन्हे दाखल असलेले कराड याच्या समितीवर झालेल्या नियुक्त्यांबाबत आता तो अटकेत असताना चर्चा सुरु झाल्या आहेत. या प्रकरणात कराड याची चौकशी होणार का, असा प्रश्न विचारण्यात येत आहे.

संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये आता वाल्मिक कराड यांच्या आवाजाचे नमुने (व्हॉइस सॅम्पल) सीआयडीकडून तपासले जाणार आहेत. प्रकरणामधील प्रमुख आरोपी असलेल्या विष्णू चाटेचा व्हॉईस सॅम्पल का (बुधवारी)घेण्यात आले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com