PM Modi and Bima Sakhi Yojana: आता 'लाडकी बहीण' होणार अधिक आत्मनिर्भर!, पंतप्रधान मोदींनी महिलांसाठी आणली मोठी योजना!

Bima Sakhi Yojana : या योजनेत भारतीय जीवन विमा निगमची महत्त्वाची भूमिका राहील. विमा सखी योजने अंतर्गत महिलांना मासिक वेतनही दिले जाईल
PM Modi
PM ModiSarkarnama
Published on
Updated on

Bima Sakhi Yojana News : पंतप्रधान नरेंद्र मोदी महिलांमध्ये आर्थिक साक्षरता आणि विमा जागरूकतेला प्रोत्साहन देण्यासाठी आता नवीन योजना आणत आहेत. पंतप्रधान मोदी यासाठी विमा सखी योजनेचा शुभारंभ करणार आहेत. ९ डिसेंबर रोजी हरियाणामधील पानीपतमध्ये पंतप्रधान मोदी विमा सखी योजनेची सुरुवात करतील. या योजनेत भारतीय जीवन विमा निगमची महत्त्वाची भूमिका राहील. विमा सखी योजने अंतर्गत महिलांना मासिक वेतनही दिले जाईल.

इकॉनॉमिक टाईम्सच्या रिपोर्टनुसार अधिकृत निवेदनात म्हटले आहे की, भारतीय जीवन विमा निगमचा हा उपक्रम१८ ते ७० वर्षाच्या महिलांना सशक्त बनवण्यासाठी आहे. हा उपक्रम त्या महिलांसाठी आहे, ज्या दहावी पास आहेत. आर्थिक साक्षरता आणि विमा जागरूकतेला प्रोत्साहन देण्यासाठी त्यांना पहिले तीन वर्ष विशेष प्रशिक्षण आणि मानधन दिलं जाईल.

या योजनेअंतर्गत महिलांना विमा पॉलिसी विक्रीचे प्रशिक्षण दिले जाईल, जेणेकरून त्या आपल्या उत्पन्नात वाढ करतील आणि समाजात आपली आर्थिक स्थिती मजबूत करू शकतील. या योजनेचा लाभ घेण्यासाठी पहिल्या टप्प्यात ३५ हजार महिलांचा समावेश केला जाणार आहे.

PM Modi
Ashok Chavan News : श्रीजयाचा विजय सोपा नव्हता, काँग्रेसने मला घेरण्याची पुर्ण तयारी केली होती!

अधिकृत निवेदनात सांगण्यात आले आहे की, प्रशिक्षणानंतर त्या एलआयसी प्रतिनिधी म्हणून काम करू शकतात आण पदवीधर विमा सखींना जीवन विमामध्ये विकास अधिकारी म्हणून पात्र होण्याची संधी मिळेल. विमा सखी योजनेच्या शुभारंभ कार्यक्रमादरम्यान पंतप्रधान मोदी(Modi) भावी विमा सखींना नियुक्ती प्रमाणपत्र देखील वितरीत करतील.

PM Modi
Nana Patole and Aditya Thackeray : ...अखेर आदित्य ठाकरे, नाना पटोलेंसह विरोधी पक्षांच्या सदस्यांनी घेतली आमदारकीची शपथ

एलआयसीच्या वेबसाईटवर उपलब्ध माहितीनुसार, विमा सखींना पहिल्याच वर्षी एकूण ८४ हजार रुपयांचे मानधन दिले जाईल. यानंतर दुसऱ्याचवर्षी ही रक्कम ७२ हजार रुपये आणि तिसऱ्या वर्षात ६० हजार रुपये असेल. तीन वर्षांत एलआयसी एकूण २ लाख १६ हजार रुपयांचे मानधन विमा सखींना देईल. याशिवाय विमा पॉलिसी विक्री करण्यात यशस्वी ठरणाऱ्या महिलांना अतिरिक्त कमीशनचा लाभ होईल. विमा सखी म्हणून काम करणाऱ्या महिलांना अनेक प्रकारचे लाभ मिळतील, ज्याद्वारे त्या आपल्या कुटुंबाला आणि समाजात अधिक सन्मान आणि आत्मनिर्भरता प्राप्त करू शकतील.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com