
छत्रपती संभाजीनगर : राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा भाजपचे विद्यमान राज्यसभा खासदार अशोक चव्हाण यांनी मुलगी श्रीजया चव्हाण हिचा भोकर मतदारसंघातील विजय सोपा नव्हता, अशी कबुली दिली. काँग्रेस पक्षाने मला घेरण्याची पुर्ण तयारी केली होती, भोकरमध्ये पाण्यासारखा पैसा वापरला, असा दावा अशोक चव्हाण यांनी एका वृत्त वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत केला.
नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील काही मतदारसंघांच्या लढतीकडे संपुर्ण राज्याचे लक्ष होते. त्यापैकीच एक मतदारसंघ म्हणजे (Ashok Chavan) अशोक चव्हाण यांचा पारंपारिक भोकर. भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर अशोक चव्हाण यांनी आमदारकीचा राजीनामा दिला आणि या मतदारसंघातून कन्या श्रीजया चव्हाण यांच्यासाठी पक्षाकडून उमेदवारी मिळवली.
लोकसभा निवडणुकीत महायुतीला नांदेडमध्ये आलेले अपयश पाहता भोकरमधून श्रीजया चव्हाण यांना निवडून आणण्याचे मोठे आव्हान अशोक चव्हाण यांच्यासमोर होते. (Nanded) पण त्यांनी ते पेलले आणि भोकर मतदारसंघ पक्षांतरानंतरही चव्हाण कुटुंबाकडेच राखला. दरम्यान, श्रीजया चव्हाण निवडून येऊ नये यासाठी काँग्रेसने कसे जंगजंग पछाडले होते? याचा खुलासा अशोक चव्हाण यांनी एका चॅनलशी बोलताना केला.
तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांचे नाव घेत त्यांच्यावर फक्त भोकर मतदारसंघाची जबाबदारी सोपवण्यात आली होती. पाण्यासारखा पैसा आणि सोशल मिडियावर माझ्या विरोधात खोटा प्रचार करण्यात आला. काँग्रेसने मला टार्गेट केले होते, हे होणार यांची मला पुर्व कल्पना होतीच, कारण इतकी वर्षे मी काँग्रेसमध्ये होतो. त्यामुळे या परिस्थितीशी कसे लढायचे? याची रणनिती मी ठरवली होती.
लोकसभा आणि विधानसभा निवडणुक वेगळी असते. जे लोकसभेला घडले तेच विधानसभेला घडत नाही. त्यामुळेच भोकरची जागा मी 39 हजार मतांच्या फरकाने जिंकू शकलो, असे अशोक चव्हाण म्हणाले. भाजपमध्ये प्रवेश करण्याचा आपला निर्णय योग्य होता. लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर अनेक नेते काँग्रेसमध्ये परतले, पण मला विधानसभा निवडणुकीत राज्यातील चित्र बदलणार हे माहित होते, असा दावाही अशोक चव्हाण यांनी केला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.