PM Modi: शेतकऱ्यांच्या खात्यात मोदी आज सहा हजार रुपये जमा करणार!

PM Kisan 15th Installment : काही शेतकऱ्यांना यांचा लाभ मिळणार नाही.
PM Narendra Modi Birthday
PM Narendra Modi BirthdaySarkarnama
Published on
Updated on

New Delhi: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज शेतकऱ्यांना गुड न्यूज देणार आहे. प्रधानमंत्री किसान योजनेअंतर्गत आज मोदींच्या हस्ते शेतकऱ्यांच्या खात्यात १५ वा हप्ता जमा होणार आहे. सहा हजार रुपये तीन टप्यात जमा होणार आहे. मोदींचा आज झारखंड येथे दौरा आहे. यावेळी मोदींच्या हस्ते शेतकऱ्यांच्या खात्यात ही रक्कम जमा होणार आहे. पण काही शेतकऱ्यांना यांचा लाभ मिळणार नाही.

ज्या शेतकऱ्यांनी आपले बँक खाते आधार कार्डसोबत लिंक केलेले नाही, त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नसल्याची माहिती आहे. तसेच ज्या शेतकऱ्यांची केवायसी अपूर्ण आहे, अशा शेतकरी या योजनेपासून वंचित राहणार आहेत. त्यांनी लवकर केवायसी पूर्ण करावे, केवायसी पूर्ण झालेल्यांना त्याचा लाभ मिळू शकले, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

PM Narendra Modi Birthday
Maratha Reservation : मनोज जरांगे पाटलांची पुण्यात जंगी सभा; मंत्री भुजबळांचा घेणार समाचार ?

काय आहे पीएम किसान योजना

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरातील कोट्यवधी शेतकऱ्यांसाठी अनेक योजना सुरू केल्या आहेत. या योजनांमध्ये प्रधानमंत्री किसान निधी योजना (PM-Kisan Samman Nidhi) अत्यंत महत्वाची आहे. या योजनेंतर्गत सरकार दरवर्षी 6000 रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करते. ही रक्कम तीन समान हप्त्यांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होईल.

सर्वात आधी या योजनेच्या अधीन दोन हेक्टरपेक्षा कमी जागेची लागवड करणारे शेतकरी तीन भागात वर्षाकाठी 6 हजार रुपये सन्मान निधी घेत असत. त्यानंतर 12.5 कोटी शेतकरी त्यांच्या योजनेत आले. परंतु आत्ता या योजनेचा विस्तार करण्यात आला.

खास गोष्ट म्हणजे आता 2 हेक्टर क्षेत्राची अट लागू होणार नाही. ज्या व्यक्तीच्या नावाने शेत जमीन असेल त्याला प्रधानमंत्री किसान सम्मान निधि योजना (PM Kisan Samman Nidhi) याचा फायदा घेता येईल. केंद्र सरकारच्या या योजनेचा फायदा देशातील सुमारे 14.50 कोटी शेतकऱ्यांना होईल.

PM Narendra Modi Birthday
Maharashtra Politics : रामदास कदमांनी उरल्यासुरल्या राजकारणाची चव घालवली अन् स्वतःची शोभा करून घेतली...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com