Narendra Modi Big Announcement : दिल्लीतील भाजपच्या ऐतिहासिक विजयानंतर पंतप्रधान मोदींनी पहिल्याच भाषणात केली 'ही' मोठी घोषणा

Narendra Modi Speech After Delhi Assembly Election BJP Victory : पंतप्रधान मोदी म्हणाले, आज दिल्लीच्या जनतेने 'आप'दापासून दिल्लीला मुक्त केलं. दिल्लीकरांनी मला कधीच निराश नाही केलं. आता जनतेनं डबल इंजिन सरकारकडे आपला कल दिला आहे.
Narendra Modi Kashmir Speech
Narendra Modi Kashmir SpeechSarkarnama
Published on
Updated on

New Delhi News : दिल्ली विधानसभा निवडणुकीचा निकालाचं चित्र आता स्पष्ट झालं आहे. तब्बल 27 वर्षांनी भाजप दिल्लीची सत्ता पुन्हा एकदा काबीज केली आहे. अरविंद केजरीवालांच्या आम आदमी पार्टीला पराभवाचा मोठा धक्का बसला असून भाजपनं तब्बल 48 जागा जिंकल्या आहेत. तर आपला 22 जागांवर विजय मिळवता आला. आता दिल्लीतील ऐतिहासिक विजयानंतर पंतप्रधान मोदींनी (Narendra Modi) मोठी घोषणा केली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिल्लीतील विजयानंतर शनिवारी(ता.8)भाजपच्या (BJP) मुख्य कार्यालयात पक्षाचे नेते,पदाधिकारी, कार्यकर्ते यांना संबोधित केलं. ते म्हणाले,दि्ल्लीत विकास विश्वासाचा दिल्लीत विजय झाल्याचं मोदी म्हणाले. दिल्लीकरांनी कधीच भाजपला निराश केलं नाही. हरियाणा,महाराष्ट्रानंतर आता दिल्लीत नवा इतिहास लिहिला गेल्याचं म्हणत या निवडणुतील विजयाचं वर्णन केलं. दिल्लीकरांनी दिल्लीचं मालक बनू पाहणाऱ्यांना घरी बसवल्याचा टोलाही मोदींनी यावेळी अरविंद केजरीवालांना लगावला.

पंतप्रधान मोदींनी यावेळी भाजप कार्यकर्त्यांचे या दमदार विजयाबद्दल अभिनंदन केले.त्याचवेळी आम आदमी पक्षावर टीकेची झोड उठवली.दिल्लीच्या जनतेने शॉर्टकटवाल्यांचे ‘शॉटसर्किट’ केलं.तसेच दिल्लीत अहंकार,अराजकता आणि 'आप'दा चा पराभव झाल्याचा हल्लाबोलही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला.

Narendra Modi Kashmir Speech
Delhi Breaking News : 'आप'कडून दिल्लीची सत्ता हिरावताच राजधानीत भाजपची मोठी खेळी? नायब राज्यपालांनी दिले 'हे' मोठे आदेश

पंतप्रधान मोदी म्हणाले,आज दिल्लीच्या जनतेने 'आप'दापासून दिल्लीला मुक्त केलं. दिल्लीकरांनी मला कधी निराश नाही केलं. आता जनतेनं डबल इंजिन सरकारकडे आपला कल दिला आहे. त्यामुळे सबका साथ, सबका विकासचा नारा देत दिल्लीचा डबल विकास करणार असल्याचंही त्यांनी जाहीर केलं.

दिल्लीतील भाजपच्या विजयानंतर पंतप्रधानांनी मोठी घोषणा केली.ते म्हणाले,दिल्लीला आधुनिक शहर बनवणार असल्याची घोषणा त्यांनी केली.दिल्लीला विकसित भारताची विकसित राजधानी बनवण्याचा संकल्पही त्यांनी यावेळी बोलून दाखवला. यमुना नदीला दिल्लीची ओळख बनवणार असल्याचंही त्यांनी म्हटलं. तसेच हे काम कितीही कठीण असलं तरी संकल्प मजबूत असेल तरी हे कामही पूर्ण होणारच असं आश्वासनही त्यांनी यावेळी दिल्लीकरांना दिलं.

Narendra Modi Kashmir Speech
Delhi Election Update News : 'वोट कटवा पार्टी'चा आरोप खरा ठरला, एमआयएमकडून मुस्तफाबादमध्ये 'आप'चा खेळ खल्लास!

मोदी म्हणाले, जी लोकं दिल्ली आपल्या मालकीची असल्याचं सांगत होते,त्यांना जनतेने दाखवून दिले की, दिल्लीचे खरे मालक फक्त आणि फक्त दिल्लीची जनता आहे.ज्यांना दिल्लीचे मालक होण्याचा अहंकार होता,त्यांचा अहंकार या निवडणुकीत मातीमोल झाला आहे.दिल्लीच्या राजकारणात शॉर्टकट अन् खोटारडेपणाला जागा नसल्याचंही पंतप्रधानांनी आपल्या भाषणात ठणकावून सांगितलं.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com