Delhi Election Update News : 'वोट कटवा पार्टी'चा आरोप खरा ठरला, एमआयएमकडून मुस्तफाबादमध्ये 'आप'चा खेळ खल्लास!

MIM candidates lead to losses for Congress and AAP in Delhi elections : दुसरीकडे ओखला विधानसभा मतदारसंघात मात्र आम आदमी पक्षाने एमआयएमकडून होणारे नुकसान रोखण्यात यश मिळवले. एमआयएमच्या शिफा उर रहमान खान यांना 38 हजार 904 इतकी मंत मिळाली. तर त्यांच्याविरोधात निवडून आलेले आम आदमी पक्षाचे अमानतउल्ला खान यांना 75 हजार 199 मतांसह विजय मिळाला.
Asaduddin Owasi-Arvind Kejriwal News
Asaduddin Owasi-Arvind Kejriwal NewsSarkarnama
Published on
Updated on

AIMIM News : दिल्ली विधानसभा निवडणुकीत असदुद्दीन ओवैसी यांच्या एमआयएमने 70 पैकी केवळ दोन मतदारसंघात उमेदवार दिले होते. ओखला आणि मुस्तफाबाद या दोन्ही मुस्लीमबहुल भागात ओवेसी-इम्तियाज जलील यांनी दोन आठवडे ठाण मांडून प्रचार केला. परंतु या दोन्ही मतदारसंघातील एमआयएमचे उमेदवार पराभूत झाले. त्यांनी निर्णायक अशी मतं घेतल्याने आम आदमी आणि काँग्रेस पक्षाला याचा चांगलाच फटका बसला.

ओखला मतदारसंघातून भाजपाचे मनीष चौधरी हे पराभूत झाले आहेत, तर मुस्तफाबाद मतदारसंघात भाजपाचे मोहन सिंह बिष्ट यांनी मात्र विजय मिळवला. मोहन सिंह यांनी आम आदमी पक्षाच्या अदील अहमद खान यांचा 17 हजार 578 मतांनी पराभव केला. या मतदारसंघात (AIMIM) एमआयएमच्या ताहेर हुसैन यांना 33 हजार 474 मते मिळाली.

तर भाजपाचे विजयी उमेदवार मोहन सिंह यांना 85 हजार 215 मतांसह मोठा विजय मिळाला. आपच्या अदील अहमद खान 67 हजार 637 मतं मिळाली आहेत. ही आकडेवारी पाहता एमआयएमच्या ताहेर हुसैन यांना मिळालेल्या 33 हजाराहून अधिक मतांमुळेच आपच्या अदिल खान यांचा पराभव झाल्याचे स्पष्ट होते. दुसरीकडे ओखला विधानसभा मतदारसंघात मात्र आम आदमी पक्षाने (Aam Admi Party) एमआयएमकडून होणारे नुकसान रोखण्यात यश मिळवले.

Asaduddin Owasi-Arvind Kejriwal News
Delhi Election Results 2025 : "लढा आणि एकमेकांना संपवा..." दिल्ली विधानसभा निकालाची आकडेवारी समोर येताच ओमर अब्दुल्लांचा आप-काँग्रेसवर हल्लाबोल

एमआयएमच्या शिफा उर रहमान खान यांना 38 हजार 904 इतकी मंत मिळाली. तर त्यांच्याविरोधात निवडून आलेले आम आदमी पक्षाचे अमानतउल्ला खान यांना 75 हजार 199 मतांसह विजय मिळाला. या मतदारसंघात भाजपाचे उमेदवार मनीष चौधरी 38 हजार 477 मतासंह तिसऱ्या क्रमांकावर राहिले.

Asaduddin Owasi-Arvind Kejriwal News
Aam Adami Party : 11 वर्षांत 'आप' सरकारचा 'स्ट्राइक'रेट कसा राहिला; आतिशी यांच्या टीममध्ये किती बदल होणार?

एकूणच मुस्लिम बहुल भागात एमआयएमने दिलेल्या उमेदवारांचा थेट फायदा भाजपा आणि आम आदमी पक्षाला झाला. एमआयएमवर सातत्याने 'वोट कटवा पार्टी'असा आरोप केला जातो. तो ओखला, मुस्तफाबाद या दोन मतदारसंघात खरा ठरला आहे. एमआयएमचे सर्वेसर्वा ओवेसी, महाराष्ट्रातील पक्षाचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांनी या दोन्ही मतदारसंघातील गल्लीबोळात जाऊन प्रचार केला होता. दोघांच्याही सभा, पदयात्रा, काॅर्नर सभांना मोठा प्रतिसाद मिळाला होता.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com