Thane Kalwa Hospital: मुख्यमंत्र्यांनी कळवा रुग्णालयाचा घेतला आढावा; १० दिवसांत अहवाल सादर करण्याचे आदेश

CM Eknath Shinde On Thane Hospital Deaths: ठाण्यातील कळवा रुग्णालयात तीन दिवसांत २७ जणांचा मृत्यू
CM Eknath Shinde
CM Eknath Shinde Sarkarnama
Published on
Updated on

Thane News: ठाण्याच्या कळवा रुग्णालयात एकाच रात्रीत १८ रुग्णांचा मृत्यू झाल्याने राज्यात मोठी खळबळ उडाली. त्यावरून राज्याच्या आरोग्य यंत्रणेवर विरोधकांनी कडक ताशेरे ओढले. त्यानंतर राज्याच्या आरोग्यमंत्र्यांनी तातडीने आढावा घेत दोन दिवसांत या प्रकरणाचा अहवाल येईल, असे सांगितले. तर सोमवारी रात्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रुग्णालयाला भेट देत परिस्थितीचा आढावा घेतला.

ठाणे पालिकेच्या कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात गुरुवारपासून सोमवारपर्यंत २७ जणांचा मृत्यू झाला. बुधवारी पाच जणांचा मृत्यू झाला, तर रविवारी १८ जणांच्या मृत्यूने एकच खबळ उडाली. त्यानंतर सोमवारी पुन्हा ४ जणांचा मृत्यू झाला. या सर्व परिस्थितीचा आढावा घेऊन मुख्यमंत्री शिंदे यांनी पत्रकार परिषद घेत सविस्तर माहिती दिली.

CM Eknath Shinde
President's Police Medal: राज्यातील 33 पोलिसांना ‘पोलीस शौर्य पदक’ तर 40 पोलिसांना ‘पोलीस पदक’

"कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात झालेल्या मृत्यू प्रकरणांची सखोल चौकशी करण्यात येईल. या चौकशीचा अहवाल २५ ऑगस्टपर्यंत मागवण्यात आला आहे. हा अहवाल आल्यानंतर योग्य ती कारवाई करण्यात येईल", असे आश्वासन मुख्यमंत्री शिंदे यांनी दिले.

CM Eknath Shinde
Kalwa Hospital Patient Deaths: एकाच रात्रीत १७ रुग्णांचा मृत्यू अन्‌ आरोग्य मंत्री म्हणतात, ‘अहवाल आल्यावर कारवाई करू’

१८ लोकांचा झालेल्या मृत्यू प्रकरणी रविवारीच चौकशी समिती नेमली असून आरोग्य आयुक्त, जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त, उपसंचालक, सिव्हील सर्जन अशा नऊ लोकांचा या समितीत समावेश करण्यात आला आहे. २५ तारखेपर्यंत या दुर्घटनेचा अहवाल सादर करण्याच्या सूचना समितीला देण्यात आल्या असून अहवाल आल्यानंतर कारवाई होईल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

Edited By- Ganesh Thombare

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com