
Buldhana : भाजपने आपल्यासमोर युतीचा प्रस्ताव ठेवला आहे. पण भाजपसोबत आधीच एकनाथ शिंदे आणि अजित पवार आहेत. त्यामुळे भाजपच्या ऑफरवर कोणताही निर्णय घेतला नाही असा मोठा गौप्यस्फोट मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला आहे. यावर आता शिंदे गटाचे नेते व खासदार प्रतापराव जाधव यांनी मोठे विधान केले आहे.
खासदार प्रतापराव जाधव(Prataprao Jadhav) यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी राज ठाकरेंचा गौप्यस्फोट, संजय राऊतांच्या टीकेसह अनेक मुद्द्यांवर भाष्य केले. जाधव म्हणाले, राज ठाकरेंचा स्वतंत्र पक्ष आहे. सगळेच पक्ष स्वतंत्र आहे. तर अजितदादांचा राष्ट्रवादी पक्षही स्वतंत्र आहे. पण त्यांचे अजून पक्क व्हायचेय, कुणाला कुणासोबत जायचे ते.मात्र,ऑफर स्वीकारायची की नाही, हा त्या पक्षाचा प्रश्न आहे असेही ते म्हणाले.
राऊत खोट्या बातम्या पेरणारा माणूस....
संजय राऊत खोट्या बातम्या पेरणारा माणूस आहे. सकाळचा भोंग्या आणि करमणूक म्हणून त्याकडे लोक पाहतात. मीडियाने त्याला प्रमाणापेक्षा जास्त महत्त्व दिले. अमित शाह यांच्या मनातले जाणणारा हा का मनकवडा आहे का ? ते जो निर्णय घेतील ते घेतील. पण संजय राऊतला भाटगिरी करायला आम्ही नेमलेले नाही असेही खासदार प्रतापराव जाधव म्हणाले.
भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढणार..?
खासदार जाधव म्हणाले, आम्हाला कुठलीही तांत्रिक अडचण राहिलेले नाही. शिवसेना पक्ष आम्हाला मिळाला, त्यावर कोणी ऑब्जेक्शन घेतले नाही.विधानसभा अध्यक्ष कायदेतज्ञ आहेत. त्यामुळे कुठलीही अडचण येणार नाही. पण ठाकरे गटाला मिळालेलं मशाल चिन्हावर ही समाजवादीने दावा केला. मशाल चिन्ह त्यांच्या हातून गेले तर त्यांना दुसरे पाहावे लागेल अशी टीका ठाकरे गटावर केली आहे.
'' त्यांनी फक्त आता त्यांचा काँग्रेस पक्षा सांभाळावा..''
विजय वडेट्टीवार(Vijay Wadettiwar) याना नुकतेच विरोधी पक्षनेतेपद मिळाले. विरोधी पक्षनेता म्हणून मी किती सक्षम आहे. हे दाखवण्याचा प्रयत्न करणे, अशा बातम्या पेरणे ,चर्चेत राहणे हे त्यांना आवश्यक आहे. त्यांनी फक्त आता त्यांचा काँग्रेस पक्षा सांभाळावा असा सल्लाही त्यांनी वडेट्टीवारांना दिला.
आत्तापर्यंतच्या मुख्यमंत्र्यांनी दौरे केले नसतील तेवढे...
तसेच प्रकृतीचे कारण असते तर त्यांनी उद्धव ठाकरेसाहेंबाना अडीच वर्षांपूर्वी विचारायला पाहिजे होते की, तुम्ही सांभाळू शकता का असा सवाल खासदार जाधव यांनी काँग्रेस नेते आणि विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांना केला आहे.
शरद पवार - अजित पवार भेट यांच्या भेटीमुळे महाविकास आघाडीत चलबिचल आहे. नाना पटोले, उद्धव ठाकरेंसह सगळे नेते अस्वस्थ आहेत. त्यांच्या भेटीचा काय विषय होता, हे तेच सांगतील. आधीपासूनच महाविकास आघाडी अस्वस्थ होती. मात्र, आता तर जास्त अस्वस्थ झाली आहे असा टोलाही खासदार जाधवांनी यावेळी लगावला.
एकनाथ शिंदे अतिशय फिट माणूस आहे. चोवीस तास काम करण्याची क्षमता त्यांच्यात आहे. मागच्या एकही मुख्यमंत्र्यांनी दौरे केले नसतील तेवढे दौरे शिंदे यांनी केले असेही ते म्हणाले. तसेच विरोधकांना विरोध करायचे म्हणून केलेल्या या गोष्टी आहेत असेही त्यांनी यावेळी सांगितले.
खासदार राऊतांच्या 'त्या' विधानाचा समाचार...
संजय राऊतां(Sanjay Raut)नी शिवसेना संपवण्याची सुपारी घेतलीय का असा प्रश्न उपस्थित करुन सगळ्या आतील गोष्टी त्यांना कशा माहिती होतात असेही खासदार जाधव म्हणाले. २०१९ ला गटनेते म्हणून एकनाथ शिंदेच होते. पण लाळचाटे लोकांनी उद्धव ठाकरेंची प्रकृती चांगली नसताना त्यांना मुख्यमंत्रिपद घेण्यासाठी प्रवृत्त केले असा आरोपही त्यांनी केला.
संजय राऊतांनी शिवसेना संपवण्याचा विडा उचलला होता. नंतर शिवसेना फुटली. आणि त्यांनी शिवसेना फोडण्याचे काम करूनही दाखविले. जर त्यावेळी भाजपाच विरोध असता तर आता आमचे ५० आमदार असताना फडणवीस यांनी शिंदे यांचे नाव पुढे केले नसते. त्यांचा कोणताही वाद नाही.
(Edited By Deepak Kulkarni)
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.