New Delhi News : सुप्रीम कोर्टाने इलेक्टोरोल बाँड योजना रद्द केल्यानंतर विरोधकांकडून भाजपवर टीकेची झोड उठवण्यात आली आहे. या योजनेतून सर्वाधिक पैसे भाजपच्या तिजोरीत जमा झाले आहेत. हा सर्वात मोठा घोटाळा असल्याचा आरोप विरोधकांकडून केला जात आहे. त्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi News) यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. त्यांनी एका टीव्ही चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत विरोधकांवर पलटवार केला.
सुप्रीम कोर्टाने (Supreme Court) योजना रद्द केल्याने सरकारला मोठा झटका असल्याचे मानले जात आहे. त्यावर बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले, कोणतीही व्यवस्था पूर्णपणे योग्य नसते, त्यातील त्रुटी दूर केल्या जाऊ शकतात. या योजनेवर टीका करणारे लोकांना पश्चाताप होईल. आम्ही असे काय केले की, ज्यामुळे मी त्याकडे एक धक्का म्हणून पाहू.
सरकारच्या निवडणूक रोखे (Electoral Bond Scheme) योजनेमुळेच पक्षांना मिळालेल्या दानाचे स्राेत आणि त्याचे लाभार्थी समजू शकले. त्याची माहिती मिळाली आहे, याचे कारण निवडणूक रोखे आहेत. 2014 च्या आधी निवडणुकांमधील (Election 2024) पैशांच्या स्राेतांची माहिती कुणी देऊ शकेल का, असा सवालही मोदींनी उपस्थित केला.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
आपल्या प्रत्येक कामात राजकारण (Latest Political News) पाहू नये, असे सांगत मोदी म्हणाले, मी देशासाठी काम करतो. मते माझ्यासाठी महत्त्वाची असती तर पूर्वेकडील राज्यांसाठी एवढे काम केले नसते. आपल्या सरकारमधील मंत्र्यांनी 150 हून अधिकवेळा या भागाचा दौरा केला आहे. इतर पंतप्रधानांच्या तुलनेत मीही तिथे अनेकदा गेल्याचे पंतप्रधान मोदींनी सांगितले.
ईडीची स्थापना आम्ही केली नाही
मागील काही महिन्यांत ईडीकडून विरोधकांवर होत असलेल्या कारवाईमुळे सरकार टीका होत आहे. त्यावरही मोदींनी भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले, ईडीची स्थापना आम्ही केली नाही. पीएमएल कायदा आणणारे सरकारही आमचे नव्हते. ईडी स्वतंत्रपणे काम करणारी संस्था आहे. ईडीच्या कामात आम्ही ढवळाढवळ करत नाही. काँग्रेसच्या दहा वर्षांच्या सत्ताकाळात ईडीने केवळ 35 लाख रुपये जप्त केले. आता ईडीने 2 हजार 200 कोटी काळा पैसा जप्त केल्याचे पंतप्रधानांनी सांगितले.
R
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.