Donald Trump PM Modi : ट्रम्प फोनची वाट बघत होते, पण मोदींनी दाखविला इंगा अन्..! अमेरिकन अधिकाऱ्याने केला मोठा गौप्यस्फोट...

India US trade deal delay : डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून देण्यात येणाऱ्या टेरिफ वाढीच्या धमक्या हे धोरणात्मक कारणासाठी नव्हे त्यांच्या अहंकारापोटी असल्याचे संकेत मिळू लागले आहेत.
Donald Trump, PM Narendra  Modi
Donald Trump, PM Narendra Modi Sarkarnama
Published on
Updated on

Modi Trump relations : मागील काही दिवसांपासून अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून पुन्हा एकदा भारताला टेरिफ वाढविण्याची धमकी दिली जात आहे. तसेच दोन्ही देशांतील व्यापार करार अनेक महिन्यांपासून रखडला आहे. याबाबत आता अमेरिकेतील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने मोठा गौप्यस्फोट केला आहे. ट्रम्प हे मोदींवर प्रचंड नाराज असल्याचे समोर आले आहे.

अमेरिकेचे वाणिज्य सचिव हॉवर्ड लटनिक यांनीच याबाबत माहिती दिली आहे. त्यांनी भारत आणि अमेरिकेतील व्यापार कराराबाबत मोठा खुला केला आहे. पंतप्रधान मोदी यांनी आतापर्यंत एकदाही याबाबत थेट ट्रम्प यांच्याशी संवाद साधलेला नाही, करार लटकण्याचे कारण कोणतेही धोरणात्मक मतभेद नाहीत, तर पंतप्रधान मोदींनी थेट ट्रंप यांना फोन न करणे, हे आहे.

लटनिक यांनी एका मुलाखतीत हा दावा केला आहे. कराराचा संपूर्ण आराखडा तयार होता. त्यावर शिक्कामोर्तब करण्यासाठी पंतप्रधान मोदींनी ट्रम्प यांच्याशी फोनवर बोलणे अपेक्षित होते. भारत सरकार त्यासाठी तयार नव्हते. अखेरपर्यंत फोन करण्यात आला नाही. आम्ही इंडोनेशिया, फिलीपिन्स, व्हिएतनामसोबत करार केला. त्यांच्याआधी भारतोबत करार होईल, अशी अपेक्षा होती.

Donald Trump, PM Narendra  Modi
Lalu Prasad Yadav : लालू प्रसादांच्या अडचणीत मोठी वाढ! 'लँड फॉर जॉब' प्रकरणात कोर्टाचा दणका; आता थेट...

दरम्यान, ट्रम्प यांच्याकडून देण्यात येणाऱ्या टेरिफ वाढीच्या धमक्या हे धोरणात्मक कारणासाठी नव्हे त्यांच्या अहंकारापोटी असल्याचे संकेत मिळू लागले आहेत. मोदींनी फोन केला नाई म्हणून त्यांचा अहंकार दुखावला. त्याची किंमत भारताला ५० टक्क टेरिफच्या रुपाने चुकवावी लागली. आता ट्रम्प यांच्याकडून आणखी टेरिफ वाढविण्याची धमकी दिली आहे.

Donald Trump, PM Narendra  Modi
मोठी बातमी: ममता बॅनर्जींवर अटकेची टांगती तलवार? ED च्या हाती लागलेल्या 'त्या' फाईल्समध्ये नेमकं दडलंय काय?

ट्रम्प आणि मोदी यांच्यामध्ये फेब्रुवारी महिन्यात व्यापार कराराबाबत सहमती झाली होती. त्यानंतर दोन्ही देशांकडून करारावर वेगाने चर्चा पुढे नेण्यात आली. पण त्यानंतर भारताकडून सुरू असलेल्या रशियातील तेलाच्या खरेदीने कराराला ब्रेक लागल्याचे बोलले जाते. ट्रम्प यांनी भारताने हे तेल घेणे बंद करावे, अन्यथा टेरिफ लावू, अशी नुसती धमकीच दिली नाही तर टेरिफही लावले. आता पुन्हा एकदा रशियाच्या खांद्यावर बंदूक ठेवत ट्रम्प भारताला झुकविण्याचा प्रयत्न करत आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com