Maharashtra : PM मोदींचे निर्देश, फडणवीस यांना फ्री हॅन्ड; मुंडे-कोकाटेंचा राजीनामा होणार?

PM Narendra Modi Directs to CM Devendra Fadnavis : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना स्वच्छ कारभारासाठी फ्री हॅन्डच दिला आहे.
devendra fadnavis | narendra modi
devendra fadnavis | narendra modisarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : प्रशासनात पारदर्शकता, प्रामाणिकता आणि शिस्त आणण्यासाठी सर्व ते प्रयत्न करा. स्वच्छ प्रशासनासाठी कोणाचीही पर्वा करू नका, असे स्पष्ट निर्देश देत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना स्वच्छ कारभारासाठी फ्री हॅन्डच दिला आहे. नवी दिल्ली इथे झालेल्या साहित्य संमेलनामध्ये दोघांची भेट झाली होती. या भेटीदरम्यान झालेल्या चर्चेत हे निर्देश दिले असल्याची माहिती आहे.

साम वृत्तवाहिनीने दिलेल्या वृत्तानुसार, प्रशासनाच्या कारभार पारदर्शकता आणण्यासाठी आणि सरकारची प्रतिमा स्वच्छ ठेवण्यासाठी पंतप्रधान मोदी (Narendra Modi) आग्रही आहेत. महायुती सरकार स्थापन झाल्यापासून देवेंद्र फडणवीसही यासाठी काम करताना दिसत आहेत. त्यातूनच त्यांनी सरकार स्थापन झाल्यानंतर 100 दिवसांचा कृती कार्यक्रम आराखडा तयार करण्याचे निर्देश दिले होते. हिवाळी अधिवेशन संपल्यानंतर त्यांनी स्वतः या आराखड्याबाबतच्या बैठका घेतल्या होत्या. 

devendra fadnavis | narendra modi
Congress : पदाधिकाऱ्यांचे राजीनामे, धंगेकरांचा शिवसेना प्रवेश निश्चित; पुणे काँग्रेसला कोण सावरणार?

सर्व मंत्र्यांना अधिकारी, सचिव स्वच्छ आणि कामाचा झपाटा असणारे मिळावेत यासाठी सनदी अधिकाऱ्यांचा मुलाखतीही घेण्यात आल्या. त्यानंतरच या अधिकाऱ्यांना नियुक्ती देण्यात आली. पण त्यानंतरही मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप होत आहेत. कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांना थेट न्यायालयानेच शिक्षा सुनावली आहे. उद्योग खात्यात अधिकारी परस्पर निर्णय घेतात असा आरोप स्वतः मंत्री उदय सामंत यांनीच केला होता.

devendra fadnavis | narendra modi
Sanjay Raut: नीलम गोऱ्हे निर्लज्ज बाई; राऊतांचा हल्लाबोल; 'राजकीय कुंडली'च मांडली... VIDIO पाहा

याच सगळ्याच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना पुन्हा एकदा स्वच्छ कारभारासाठीच्या सूचना दिल्या असल्याचे सांगितले जात आहे. प्रशासनात पारदर्शकता, प्रामाणिकता आणि शिस्त आणण्यासाठी सर्व ते प्रयत्न करा. स्वच्छ प्रशासनासाठी कोणाचीही पर्वा करू नका, असे स्पष्ट निर्देश मोदी यांनी फडणीस यांना दिले असल्याची माहिती आहे. आता यामुळे मुंडे आणि कोकाटे यांचे राजीनामे होणार का? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com