Congress : पदाधिकाऱ्यांचे राजीनामे, धंगेकरांचा शिवसेना प्रवेश निश्चित; पुणे काँग्रेसला कोण सावरणार?

Pune Congress : काँग्रेसचे कसब्याचे माजी आमदार रवींद्र धंगेकर यांचा शिवसेना प्रवेश जवळपास निश्चित झाला आहे. त्याचवेळी शहरातील अनेक पदाधिकाऱ्यांनी सामुहिक राजीनामे देत काँग्रेसचा हात सोडला आहे.
Ravindra Dhangekar, Congress
Ravindra Dhangekar, CongressSarkarnama
Published on
Updated on

पुणे : काँग्रेसचे कसब्याचे माजी आमदार रवींद्र धंगेकर यांचा शिवसेना प्रवेश जवळपास निश्चित झाला आहे. त्याचवेळी शहरातील अनेक पदाधिकाऱ्यांनी सामुहिक राजीनामे देत काँग्रेसचा हात सोडणार आहेत. या पदाधिकाऱ्यांचा लवकरच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश होणार आहे. अशा स्थितीमध्ये आता घरघर लागलेल्या पुणे काँग्रेसला कोण सावरणार? असा सवाल विचारला जात आहे.

पुणे शहर कधी काळी काँग्रेसचा बालेकिल्ला होता. माजी मंत्री सुरेश कलमाडी यांच्या नेतृत्वात काँग्रेसने अनेकदा महापालिकेपासून, विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत दणदणीत विजय मिळवले. पण 2014 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपने काँग्रेसकडून हा बालेकिल्ला ताब्यात घेतला. पाठोपाठ विधानसभेच्या शहरातील आठही जागांवर कमळ फुलविले. 2017 मध्ये महापालिकेवरही सत्ता आणून दाखवली. 2019 च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीतही हेच चित्र बघायला मिळाले.

या सततच्या पराभवांमुळे काँग्रेसच्या (Congress) शहरातील अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह तयार झाले होते. अशात 2023 मध्ये रविंद्र धंगेकर कसबा पोटनिवडणुकीत विजयी झाले. या विजयाने काँग्रेसमध्ये प्राण फुंकले. काँग्रेसला नवीन आत्मविश्वास मिळाला. याच आत्मविश्वासाच्या जोरावर धंगेकर यांनी वर्षभरात लोकसभेचीही निवडणूक लढवली. त्यांच्या प्रचार सभेच्या निमित्ताने अनेक वर्षांनंतर राहुल गांधी पुण्यात येऊन गेले. भाजपला काँग्रेस तगडी फाईट देऊ शकतात असे वातावरण शहरात तयार झाले.

Ravindra Dhangekar, Congress
Congress News : महाराष्ट्र काँग्रेसमध्ये उद्या मोठ्या घडामोडींचे संकेत; मुंबईत पडद्यामागे नेमके काय घडतंय ?

पण लोकसभा निवडणुकीत धंगेकर यांचा पराभवा झाला. ते कसब्यातूनही मागे पडले. ऑक्टोबर महिन्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीतही धंगेकर यांना भाजपच्या हेमंत रासने यांच्याकडून 12 हजार मतांनी पराभव स्वीकारावा लागला होता. त्यानंतर धंगेकर यांच्याविरोधात अनेक दिवस दाबून ठेवलेली नाराजी उफाळून आली. ते काँग्रेसमध्ये असूनही ते काँग्रेसला आणि काँग्रेसच्या विचारधारा मानत नसल्याच्या तक्रारी त्यांच्याविरोधात सुरू झाल्या. कधी त्यांच्यातील शिवसैनिक जागा होतो तर कधी ‘मनसे’च्या ‘खळ्ळखट्याक’च्या भूमिकेत ते वावरत असल्याच्या तक्रारी काँग्रेस कार्यकर्ते आणि पदाधिकारी सातत्याने करत राहिले.

अशात आता धंगेकरांची शिवसेनेत घरवापसी होणार हे निश्चित आहे. नुकताच त्यांनी व्हॉट्सअ‍ॅप स्टेटसला सूचक फोटो प्रसिद्ध केला होता. त्यामुळे या चर्चेला जोर मिळाला. मंत्री उदय सामंतही त्यांना पक्षात येण्याचा प्रस्ताव जाहीरपणे देऊन गेले. त्यामुळे धंगेकर यांच्या पक्ष प्रवेशाची केवळ औपचारिकताच राहिल्याचेही बोलले जात आहे. त्याचवेळी शहर काँग्रेसचे पदाधिकारी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. येत्या आठ ते दहा दिवसात उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या उपस्थितीत पदाधिकाऱ्यांचा प्रवेश होणार आहे.

Ravindra Dhangekar, Congress
"Congress पक्षात माझी भूमिका काय?" नाराज शशी थरूर यांचा राहुल गांधींना एकच प्रश्न

शहर काँग्रेसमधील अंतर्गत नाराजीमुळे पदाधिकारी राजीनामे देणार आहेत. शहर काँग्रेसमध्ये समन्वय नसल्याचा पदाधिकाऱ्यांचा आरोप आहे. पक्षाकडून होत असलेल्या बैठकीत कुठल्याही प्रकारची प्रतिक्रिया आणि दाद मिळत नसल्याने आपण हा निर्णय घेतल्याचे पदाधिकाऱ्यांनी सांगितले आहे. एकूणच या स्थितीवर आता मार्ग कोण काढणार? नवीन प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ पुण्यातील ही स्थिती कशी सावरणार? हे बघणे महत्वाचे ठरणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com