PM Modi Meet President Droupadi Murmu : केंद्रात हालचालींना वेग; नरेंद्र मोदी, अमित शाह राष्ट्रपतींना भेटले! समान नागरी कायदा की मंत्रिमंडळात बदल?

Narendra Modi & Amit Shah : रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांची भेटी घेतली. या भेटीनंतर गृहमंत्री अमित शाह हे देखील स्वतंत्रपणे राष्ट्रपतींना भेटले. या भेटीमागे नेमके काय कारण आहे, याची चर्चा दिल्लीच्या वर्तुळात सुरू झाली आहे.
President Droupadi Murmu with PM Narendra Modi and Home Minister Amit Shah during a meeting at Rashtrapati Bhavan.
President Droupadi Murmu with PM Narendra Modi and Home Minister Amit Shah during a meeting at Rashtrapati Bhavan.sarkarnama
Published on
Updated on

Narendra Modi News : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी (ता.3) अचानक राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांची भेट घेतली. पंतप्रधानांच्या भेटीनंतर गृहमंत्री अमित शाह हे देखील राष्ट्रपतींना भेटले. पंतप्रधान आणि गृहमंत्री स्वतंत्रपणे राष्ट्रपतींना भेटल्यानंतर केंद्रात हालचालींना वेग आला आहे. या भेटीमागे मोठे कारण असल्याची चर्चे आहे.

उपराष्ट्रपतीपदाची निवडणूक पुढील महिन्यात आहे. त्यातच केंद्रातील महत्त्वाची खात्यांची खांदेपालट होण्याची देखील शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री शहा नेमक्या कोणत्या कारणासाठी राष्ट्रपती मुर्मू यांना भेटले याचे तर्कवितर्क लढवले जात आहेत.

पाच ऑगस्ट 2019 ला नरेंद्र मोदी सरकारने जम्मू-काश्मीरमधील कलम 370 हटवले होते. त्याला उद्या सहा वर्ष पूर्ण होणार आहेत. त्यापार्श्वभूमीवर ही भेट घेतली गेली असल्याचे देखील बोलले जात आहे. ज्या प्रमाणे  कलम 370 हटवले त्याप्रमाणेच सरकार अचाकपणे समान नागरी कायदा आणण्याच्या तयारीत असल्याची देखील दिल्लीच्या राजकारणात चर्चा आहे.

President Droupadi Murmu with PM Narendra Modi and Home Minister Amit Shah during a meeting at Rashtrapati Bhavan.
Rahul Gandhi : खरे भारतीय असे बोलणार नाहीत! सुप्रीम कोर्टाचा राहुल गांधींना जोरदार झटका

भेटीत नेमकी काय चर्चा?

ऑपरेशन सिंदूरवर संसेदत वादळी चर्चा झाली. विरोधकांनी सरकारवर गंभीर आरोप केले. त्यातच अमेरिकेने भारतावर तब्बल 25 टॅरिफ लादला आहे. बिहार विधानसभा निवडणुकीच्या आधीच मतदार यादी पुनर्रचनेवरून मोठा वाद सुरू आहे. सुप्रीम कोर्टात विरोधकांनी धाव घेतली आहे. या सर्व मुद्यांवर गृहमंत्री आणि पंतप्रधान यांनी राष्ट्रपतींशी चर्चा केली असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

President Droupadi Murmu with PM Narendra Modi and Home Minister Amit Shah during a meeting at Rashtrapati Bhavan.
Gold chain snatching : चोरट्यांची हिंमत वाढली; थेट महिला खासदाराचीच सोनसाखळी लंपास, प्रकरण पोहचले अमित शाह, बिर्लांपर्यंत

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com