PM Modi Tours: PM मोदींनी बारा वर्षात केले 94 परदेश दौरे; 85 टक्के दौरे अधिवेशनाच्या काळातच! सविस्तर जाणून घ्या

PM Modi Tours: एकीकडं देशातील महत्वाच्या प्रश्नांवर अधिवेशनादरम्यान सभागृहांमध्ये चर्चा सुरु असताना पंतप्रधानांचे परदेश दौरे सुरु असतात.
PM Narendra Modi
PM Narendra Modi
Published on
Updated on

PM Modi Tours: संसदेचं हिवाळी अधिवेशन सध्या सुरु आहे. या अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी 'वंदे मातरम' या राष्ट्रीय गीताला १५० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त यावर दिवसभर चर्चेचं सत्र आयोजित करण्यात आलं होतं. या चर्चेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सहभाग घेतला आणि आपले विचार मांडले. त्यानंतर दुसऱ्या दिवशी पंतप्रधान सभागृहात हजर नव्हते, बऱ्याचदा मोदी सभागृहातील इतर चर्चांमध्ये सहभागी होत नाहीत. अधिवेशनाची सांगता होत असताना शेवटच्या भाषणासाठी मात्र ते पुन्हे संसदेत हजेरी लावतात. पण अधिवेशनाच्या इतर काळात ते नेमके काय करतात? असा प्रश्न अनेकांना पडतो. त्याचं उत्तर आता समोर आलं आहे.

PM Narendra Modi
Tehsildar: जमिनीच्या अनुकूल निकालाच्या बदल्यात 10 लाखांची मागणी! नायब तहसीलदारांचा झाला करेक्ट कार्यक्रम

परदेश दौरे

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अधिवेशनाच्या काळात बऱ्याचदा परदेश दौऱ्यांवर असतात. त्यांनी आत्तापर्यंत आपल्या तीन टर्मच्या कारकिर्दीतील १२ वर्षात ९४ आंतरराष्ट्रीय दौरे केले आहेत. यांपैकी ८५ टक्के दौरे हे कुठल्या ना कुठल्या अधिवेशनाच्या काळातच केलेले आहेत. म्हणजेच एकीकडं देशातील महत्वाच्या प्रश्नांवर अधिवेशनादरम्यान सभागृहांमध्ये चर्चा सुरु असताना पंतप्रधान बऱ्याचदा परदेश दौऱ्यांवर गेले आहेत. काँग्रेसनं पंतप्रधानांच्या दौऱ्यांबाबत माहिती समोर आणली आहे.

PM Narendra Modi
Election Commission : अधिवेशन सुरू असतानाच निवडणूक आयोग 'एक्स्पोज'; मतदान कार्डांबाबत धक्कादायक माहिती उघड

मोदींचे अधिवेशनादरम्यानचे आंतरराष्ट्रीय दौरे

  1. ▪️ऑगस्ट २०१४ (पावसाळी अधिवेशन)

    दौरा - नेपाळ (३-४ ऑगस्ट २०१४)

  2. ▪️मार्च २०१५ (अर्थसंकल्पीय अधिवेशन)

    दौरा - सेशेल्स, मॉरिशस, श्रीलंका (१०-१४ मार्च २०१५)

  3. ▪️नोव्हेंबर-डिसेंबर २०१५ (हिवाळी अधिवेशन)

    दौरा - फ्रान्स (३० नोव्हेंबर-१ डिसेंबर २०१५)

  4. ▪️नोव्हेंबर २०१५ (हिवाळी अधिवेशन)

    दौरा - युके (१२-१४ नोव्हेंबर २०१५)

  5. ▪️मार्च-एप्रिल २०१६ (अर्थसंकल्पीय अधिवेशन)

    दौरा - बेल्जियम, अमेरिका, सौदी अरेबिया (३० मार्च-३ एप्रिल २०१६)

  6. ▪️जुलै २०१८ (पावसाळी अधिवेशन)

    दौरा - रवांडा, युगांडा, दक्षिण आफ्रिका (२३-२८ जुलै २०१८)

  7. ▪️जून २०१९ (अर्थसंकल्पीय अधिवेशन)

    दौरा - जपान (२७-२९ जून २०१९)

  8. ▪️फेब्रुवारी २०२० (अर्थसंकल्पीय अधिवेशन)

    दौरा - नमस्ते ट्रम्प (अमेरिका) (२४-२५ फेब्रुवारी २०२०)

  9. ▪️फेब्रुवारी २०२५ (अर्थसंकल्पीय अधिवेशन)

    दौरा - फ्रान्स + अमेरिका (१०-१३ फेब्रुवारी २०२५)

  10. ▪️मार्च २०२५ (अर्थसंकल्पीय अधिवेशन)

    दौरा - मॉरिशस (११-१२ मार्च २०२५)

  11. ▪️जुलै २०२५ (पावसाळी अधिवेशन)

    दौरा - युके, मालदीव (२३-२६ जुलै २०२५)

मोदींचे देशांतर्गत दौरे

  1. ▪️पुलवामा हल्ला (फेब्रुवारी, २०१९)

    दौरा - १४ फेब्रुवारी २०१९ रोजी झालेल्या हल्ल्यात ४० सीआरपीएफ जवान शहीद. PM मोदी उत्तराखंडमधील जिम कॉर्बेट इथं माहितीपटाचं चित्रीकरणात व्यस्त. त्यानंतर काही काळातच दक्षिण कोरियाचा दौरा (२१-२२ फेब्रुवारी, २०१९)

  2. ▪️मणिपूर हिंसाचार (मे २०२३)

    दौरा - मे २०२३ ते एप्रिल २०२४ पर्यंत मोदींनी अमेरिका, फ्रान्स, युएई, यूके, ग्रीससह १४ आंतरराष्ट्रीय दौरे केले. परंतू सप्टेंबर २०२५ पर्यंत मणिपूरला भेट दिली नाही.

  3. ▪️महिला कुस्तीगीरांचं निषेध आंदेलनं पेटलं आणि बालासोर ट्रेन दुर्घटना (जून २०२३)

    दौरा - अमेरिका (२१-२३ जून २०२५) सर्वात महागडा एकल दौरा (खर्च २२ कोटींपेक्षा जास्त)

  4. ▪️पहलगाम दहशतवादी हल्ला (मे २०२५)

    दौरा - सौदी अरेबिया. भारतात परतल्यानंतर पहलगामला भेट देण्याऐवजी दुसऱ्या दिवशी बिहारला निवडणूक कार्यक्रमासाठी हजेरी.

  5. ▪️दिल्लीत दहशतवादी हल्ला (नोव्हेंबर २०२५)

    दौरा - भूतानच्या राजाच्या वाढदिवसानिमित्त भेट (११-१२ नोव्हेंबर २०२५)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com