PM Narendra Modi News : प्रचाराचा झंझावात थांबताच मोदी करणार ध्यान; ‘या’ ठिकाणाची केली निवड

Lok Sabha Election 2024 : मागील निवडणुकीनंतरही पंतप्रधान मोदींनी ध्यान केले होते. तीच परंपरा त्यांनी या निवणुकीतही कायम ठेवली आहे. मागीलवेळी त्यांनी केदारनाथ येथील गुफा निवडली होती.
PM Narendra Modi
PM Narendra ModiSarkarnama

Election Campaign Update : लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (PM Narendra Modi News) कोणत्याही नेत्यापेक्षा सर्वाधिक सभा घेतल्या आहेत. मागील दोन निवडणुकीपेक्षा जास्त सभा घेत त्यांनी यावेळी विक्रम केला. निवडणुकीचा प्रचार 30 मेला संपणार असून त्यानंतर मोदींनी ध्यानधारणा करण्याचा निर्णय घेतला आहे. चोवीस तास ते ध्यानाला बसणार आहे. मागील निवडणुकीनंतर ते एका गुफेमध्ये ध्यानाला बसले होते. (Lok Sabha Election 2024)

पंतप्रधान मोदींची 30 मेला शेवटची सभा पंजाबमधील होशियारपूर येथे आहे. या सभेनंतर त्यांचा लोकसभा निवडणुकीतीला प्रचाराचा झंझावात थांबणार आहे. त्यानंतर ते तमिळनाडूला रवाना होणार आहेत. 30 मे ते एक जून या कालावधीत ते कन्याकुमारीमध्ये (Kanyakumari) असतील. (Latest Political News)

PM Narendra Modi
AAP Minister Atishi News : अतिशी हाजिर हो! केजरीवालांचा आणखी एक मंत्री अडचणीत, कोर्टाने पाठवली नोटीस

कन्याकुमारीतील विवेकानंद रॉक मेमोरियल (Sawmi Vivekanand Rock Memorial) येथे 30 जूनची सायंकाळ ते एक जूनची सायंकाळ यादरम्यान ध्यान मंडपममध्ये ध्यान करणार आहेत. स्वामी विवेकानंद यांनीही संपूर्ण देशाचे भ्रमण केल्यानंतर याचठिकाणी तीन दिवस ध्यान करत विकसित भारताचे (India) स्वप्न पाहिले होते. पंतप्रधान मोदी चोवीस तास ध्यान करणार आहेत. (Latest Marathi News)

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

मागील निवडणुकीचा प्रचार संपल्यानंतर मोदी केदारनाथला गेले होते. केदारनाथ मंदिरापासून सुमारे एक किलोमीटर अंतरावर अशलेल्या गुफेमध्ये त्यांनी ध्यान केले होते. त्याचे फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले होते. तर 2014 मध्ये ते प्रतापगडावर आले होते.

दरम्यान, विवेकानंद रॉक मेमोरियह ठिकाण खास आहे. देश भ्रमण करताना विवेकानंद यांनी लोकांच्या समस्या, दु:ख, गरिबी, शिक्षणाची कमतरता अशा गोष्टी जवळून पाहिल्या होत्या. ते 24 डिसेंबर 1892 रोजी कन्याकुमारी येथे पोहचले होते. त्यानंतर समुद्र किनाऱ्यापासून सुमारे 500 मीटर दूरवर असलेल्या एका खडकापर्यंत पोहत गेले. त्यांनी या खडकावर 25 ते 27 डिसेंबर असे तीन दिवस ध्यान केले. याठिकाणी त्यांनी विकसित भारताचे स्वप्न पाहिले होते. या खडकावर पुढे स्मारक बनवण्यात आले.

PM Narendra Modi
Raghuram Rajan News : रघुराम राजन काँग्रेसमध्ये प्रवेश करणार? थेट पत्नीचं नाव घेत स्पष्टच बोलले...   

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com