PM Modi Peace Prize: PM मोदींच्या नावाची नोबेल शांतता पुरस्कारासाठी शिफारस? नोबेल कमिटीनं म्हटलं...

PM Modi Peace Prize : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावाची नोबेल शांतता पुरस्कारासाठी शिफारस करण्यात आल्याचं वृत्त भारतातील काही वृत्तवाहिन्यांनी दिलं आहे.
Narendra Modi
Narendra Modi
Published on
Updated on

PM Modi Peace Prize : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावाची नोबेल शांतता पुरस्कारासाठी शिफारस करण्यात आल्याचं वृत्त काही वृत्तवाहिन्यांनी दिलं आहे. त्यामुळं मोदी सध्या सोशल मीडियात चर्चेचा विषय बनले आहेत. काही जणांनी तर मोदी हे नोबेल पुरस्काराठी योग्य व्यक्ती असल्याचं म्हटलं आहे. तर काहींनी या वृत्तावर आश्चर्य व्यक्त केलं आहे. पण पंतप्रधान मोदींना खरोखरंच नोबेल पुरस्कार मिळणार का? याबाबत नॉर्वेच्या नोबेल कमिटीनं स्पष्टीकरण दिलं आहे.

Narendra Modi
Nepal Political Crisis : शाह होणार नेपाळचे नवे पंतप्रधान! तरुणांच्या हिंसक आंदोलनानंतर काय काय घडलं?

भारतीय वृत्तवाहिन्यांमध्ये मोदींच्या नोबेलची चर्चा

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर अरेरावी करत भरमसाठ टॅरिफ लावलं आणि भारताला अडचणीत आणलं. पण भारतानं रशिया आणि चीनसोबत जवळीक साधत ट्रम्प यांच्यावर कुरघोडी करण्याचा प्रयत्न केला. पण मुळातच ट्रम्प यांनी भारतासोबत अशा पद्धतीनं वागण्याण्यामागं काय कारण होतं? तर ट्रम्प यांना शांततेचा नोबेल पुरस्कार हवा आहे. याबाबत त्यांनी अनेकदा जाहीररित्या आपली इच्छाही बोलून दाखवली आहे. हीच बाब पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऑपरेशन सिंदूरबाबत बोलताना जाहीर व्यासपीठावरुन सांगितली होती. पाकिस्ताननं युद्ध थांबवण्याबाबत भारताच्या डीजीएमओला फोन करुन शरणागती पत्करल्यानंतर भारतानं युद्ध थांबवण्याचा निर्णय घेतला. यामध्ये ट्रम्प यांचा कोणताही हात नव्हता असं मोदींनी सांगितल्याचं काही हिंदी वृत्त वाहिन्यांनी म्हटलं आहे.

Narendra Modi
KP Sharma Oli: Gen Z नं पंतप्रधानांना नमवलं! नेपाळचे PM ओली यांचा अखेर राजीनामा

तसंच ट्रम्प यांनी नुकतंच ट्विट करुन हतबलता व्यक्त केली होती. आपल्या ट्विटमध्ये त्यांनी म्हटलं होतं की, भारत आणि रशियाला आम्ही चीनच्या हातून गमावलं आहे. त्यानंतर आधी आपण ७ युद्धे थांबवली असा दावा करणारे ट्रम्प आता तीन युद्धांवर आले आहेत, असं नवभारत टाइम्सनं आपल्या व्हिडिओ बुलिटनमध्ये म्हटलं आहे. त्यामुळं ट्रम्प यांनी जगभरातील अनेक देशांना छळलं असल्यानं त्यांची आता पिछेहाट होत असून उलट ट्रम्प यांना डावलून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाच शांततेचा नोबेल मिळू शकतो असंही या बुलेटिनमध्ये म्हटलं आहे. इतरही काही वृत्तवाहिन्यांना अशा आशयानंच मोदींची शांतता नोबेलसाठी शिफारस झाल्याच्या बातम्या प्रसिद्ध केल्या आहेत.

Narendra Modi
Hyderabad Gazette News : 'हैदराबाद गॅझेट'साठी महादेव कोळी समाजही आक्रमक; मुक्तीसंग्राम दिनीच दाखवणार काळे झेंडे!

नॉर्वेजियन समितीचं स्पष्टीकरण

पण या चर्चांच्या पार्श्वभूमीवर नॉर्वे येथील नोबेल कमिटीनं याबाबत स्पष्टीकरण दिलं आहे. नॉर्वेजियन नोबेल समितीचे उपनेते अस्ले तोजे यांनी स्पष्ट केलं की, "पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नोबेल पुरस्काराच्या दाव्याबद्दल आपल्या नावानं चालवण्यात आलेलं विधान खोटं आहे. आपण कधीही माध्यमांसमोर असं कोणतंही विधान केलेलं नाही. ते म्हणाले की, टीव्ही न्यूज चॅनेल आणि व्हायरल ट्विट्स या संदर्भात खोट्या बातम्या पसरवत आहेत"

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com