KP Sharma Oli: Gen Z नं पंतप्रधानांना नमवलं! नेपाळचे PM ओली यांचा अखेर राजीनामा

KP Sharma Oli: नेपाळमध्ये तरुणाईनं हिंसक आंदोलन केल्यानं परिस्थिती हाताबाहेर गेली आहे. सोशल मीडिया अॅप्स बंद केल्यानं तरुणानं आंदोलन छेडलं आहे.
KP Sharma Oli
KP Sharma OliSarkarnama
Published on: 
Updated on: 

KP Sharma Oli: नेपाळमध्ये सर्व प्रकारची सोशल मीडिया अॅप्स बंद केल्यानं जनरेशन झेड अर्थात Gen Z तरुणांनी प्रचंड मोठं आंदोलन उभं केलं असून ठिकठिकाणी हिंसाचार सुरु झाला आहे. गेल्या दोन दिवसांपासून हे आंदोलन सुरु असून पोलिसांच्या कारवाईमध्ये इथं आत्तापर्यंत २० हून अधिक तरुणांचा बळी गेला आहे. तरीही हे आंदोलन थांबायचं नाव घेत नाही, त्यामुळं अखेर नेपाळच्या सरकारला या तरुणांपुढं झुकावं लागलं असून पंतप्रधान केपी शर्मा ओली अखेर आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.

नेपाळची राजधानी काठमांडू इथं सध्या तरुणाई रस्त्यावर उतरलेली असून ठिकठिकाणी आंदोलन होताना दिसत आहेत. काही आंदोलकांनी तर नेपाळच्या संसदेलाच आग लावली असून यापूर्वी तरुणांनी संसदेत घुसून तोडफोड केली होती. काही ठिकाणी तरुणांनी हिंसक पवित्रा घेतला असून काठमांडू इथं नियोजित कलिंग साहित्य महोत्सव स्थगित करण्यात आला आहे. आयोजकांनी मंगळवारी याची घोषणा केली. १३ आणि १४ सप्टेंबर रोजी हा महोत्सव होणार होता. यामध्ये ६० हून अधिक भारतीय लेखक आणि २०० नेपाळी लेखक सहभागी होणार होते.

KP Sharma Oli
Hyderabad Gazette News : 'हैदराबाद गॅझेट'साठी महादेव कोळी समाजही आक्रमक; मुक्तीसंग्राम दिनीच दाखवणार काळे झेंडे!

दरम्यान, नेपाळचे आरोग्य मंत्री प्रदीप पौडेल यांनी तरुणाईच्या आंदोलनावर तोडगा काढण्यासाठी सरकारनं उचललेल्या पावलांवर नाराजी व्यक्त करताना आपल्या पदाचा राजीनामाही दिला. फेसबूक पोस्टच्या माध्यमातून त्यांनी आपल्या राजीनाम्याची घोषणा केली. यामध्ये त्यांनी म्हटलं की, नेपाळच्या तरुण पिढीनं केवळ सुशासन, जबाबदारी आणि न्यायाची मागणी केली होती. पण तरीही सरकारनं त्याच्यावर दबाव टाकत गोळीबार केला. देशाचं चांगलं भविष्य पाहणाऱ्या तरुणांवर गोळीबार करणं योग्य नाही, असंही त्यांनी सोशल मीडियावर लिहिलं आहे.

KP Sharma Oli
Uddhav Thackrey Politics: मुंबईच्या दसरा मेळाव्याआधीच उद्धव आणि राज ठाकरेंचे नाशिकमध्ये होणार मोठे शक्तीप्रदर्शन, हे आहे मिशन!

दरम्यान, नेपाळी तरुणांनी अर्थात जेन झी तरुणांनी केवळ सोशल मीडिया अॅप्स बंद केले म्हणून नव्हे तर देशात बोकाळलेला भ्रष्टाचार, बेरोजगारी आणि सोशल मीडियावर व्यक्त होण्याचा अधिकार हिरावून घेतल्याबद्दल या तरुणांनी आपला आक्रोश रस्त्यावर येऊन व्यक्त केला आहे. तरुणांचा संपूर्ण देशभरात उफाळून आलेला हा आक्रमक पवित्रा लक्षात घेता पंतप्रधान केपी शर्मा ओली यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांचा राजीनामा नेपाळच्या राष्ट्रपतींनी देखील स्विकारला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.