PMO news : पंतप्रधान कार्यालयात काहीतरी गडबड आहे! एकाला हटविले, एकाचा राजीनामा … महिला नेत्याच्या दाव्याने खळबळ

PMO internal reshuffle news 2025 : दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांनीही पंतप्रधान कार्यालयाबाबत गंभीर आरोप केले आहे.
PMO internal reshuffle news 2025
PMO internal reshuffle news 2025Sarkarnama
Published on
Updated on

Congress reacts to PMO changes : पंतप्रधान कार्यालयाशी संबंधित काही महत्वाच्या घडामोडींवरून विरोधकांनी हल्लाबोल चढविला आहे. काही अधिकाऱ्यांच्या राजीनाम्यावरून मोठा वाद निर्माण झाला आहे. काँग्रेससह विरोधी पक्षातील इतर नेत्यांनीही त्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे. सोशल मीडियातही याबाबतच्या चर्चेला जोर आला आहे.

काँग्रेसच्या सोशल मीडिया आणि डिजिटल टीमच्या अध्यक्षा सुप्रिया श्रीनेत यांनी याबाबत एक पोस्ट करत खळबळ उडवून दिली आहे. त्यांना या पोस्टमध्ये अधिकाऱ्यांची नावेही सांगितली आहेत. सोशल मीडियातही याबाबत जोरदार चर्चा आहे. काँग्रेस नेते पवन खेडा यांनी आज पत्रकार परिषदेतही यावरून मोदी सरकारला घेरलं.

सुप्रिया श्रीनेत यांनी सोशल मीडियात केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, अचानकपणे पंतप्रधानांचे निकवर्तीय राहिलेले ओएसडी हिरन जोशी, ज्यांच्या इशाऱ्यावर मीडिया नाचते, त्यांना अचानक हटविण्यात आले आहे. प्रसारभारतीचे अध्यक्ष नवनीत सहगल यांचाही राजीनामाही अचानक झाला आहे. आगामी काळात आणखी राजीनामे होतील, असे ऐकायला मिळत आहे.

कोणती अशी गोष्ट आहे, ज्यावर पडदा टाकला जात आहे?, असा सवाल करत श्रीनेत यांनी पुढे म्हटले आहे की, भ्रष्टाचाराबाबतची माहिती समोर येत आहे. या देशाला सत्य जाणून घेण्याचा हक्क नाही का? पंतप्रधान कार्यालयात काहीतरी गडबड आहे, असा दावाही त्यांनी केला आहे.

PMO internal reshuffle news 2025
Maharashtra Elections : ZP, महापालिकांचा बिगुल वाजण्याआधी 'या' निवडणुका पुढे ढकलल्या; राज्य सरकारचा मोठा निर्णय...

दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांनीही पंतप्रधान कार्यालयाबाबत गंभीर आरोप केले आहे. त्यांनी सोशल मीडियात केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, विरोधी पक्षातील नेत्यांवर ‘महादेवा’ची विशेष कृपेची बातमी होती. साहेबांनी लिमिटेड कारवाईसाठी आपल्या तोता-मैनेला लावले. पण प्रकरण हातातून निसटले. केवळ विरोधकांना टार्गेट करण्याचे आदेश होते.

PMO internal reshuffle news 2025
Nitin Gadkari News : चंद्रावर जेवढा खर्च झाला नाही तेवढा ‘या’ रस्त्यावर! लोकसभेत ठाकरेंच्या खासदाराने गडकरींना आधी डिवचले नंतर हात जोडले...

साहेबांना अंदाजच नव्हता की, भांडाफोड असा होईल, ज्याने साहेबांचे हेही सत्य समोर येईल की, ‘महादेवा’ची खरी कृपा त्यांच्याच कार्यालयावर झाली आहे. आता? सत्ता तुमची आहे, कोणी तपास होऊ देणार नाही. मीडियावर चर्चा तर सोडा एक बातमीही चालू देणार ही. पण भांडाफोड तर झाला आहे. ‘हिरण’च्या ’जोश’च्या जीवावर देशासोबत गद्दारीची ‘बेटिंग’चा खेळ तर संपला, अशी टोला सिसोदिया यांनी लगावला आहे.   

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com