PM Narendra Modi Speech : तुम्हाला तुमच्या घरात हे ऐकायला मिळणार नाही, म्हणून मीच बोललो! पंतप्रधान मोदींनी घेतली खर्गेंची फिरकी

Parliament Session Rajya Sabha Latest News Mallikarjun Kharge Speech : मल्लिकार्जून खर्गे यांनी आपल्या भाषणादरम्यान शेरोशायरीतून सरकारवर निशाणा साधला होता.
Mallikarjun Kharge, Narendra Modi
Mallikarjun Kharge, Narendra ModiSarkarnama
Published on
Updated on

Rajya Sabha PM Modi Speech : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गुरूवारी राज्यसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी त्यांनी शेरोशायरी करत, कवितेच्या काही ओळी ऐकवत काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे आणि काँग्रेसवर निशाणा साधला. यादरम्यान पंतप्रधान मोदींसह सभापतीही खदखदून हसले.

खर्गेजी तुमच्यासमोर चांगलीच शेरोशायरी करतात. त्यांचा ऐकवण्याचा त्यांना शौक आहे. सभापतीजी तुम्हीही त्याची खूप मजा लुटता, असे पंतप्रधान मोदी म्हणताच सभापती जगदीप धनखड खदखदून हसले. त्यानंतर मोदींनी खर्गेंकडे पाहत म्हटले की, एक शेर मीही कुठेतरी वाचला होता. तमाशा करनें वालों को क्या खबर, हमनें कितने तुफानों को पार कर दिय जलाया है, हा शेर मोदींनी ऐकवला. सत्ताधारी सदस्यांनी बाके वाजवून त्याला दाद दिली.

Mallikarjun Kharge, Narendra Modi
Delhi Election 2025 : एक्झिट पोलमध्ये सर्वाधिक जागा दाखवूनही भाजपला टेन्शन; हे आहे मोठं कारण...

आदरणीय खर्गेजी ज्येष्ठ नेते आहेत, मी त्यांचा नेहमी सन्मान करतो. सार्वजनिक आयुष्यात एवढी वर्षे, ही छोटी गोष्ट नाही. या देशात शरद राव असो की खर्गेजी, या सर्वांच्या आयुष्यातील ही असामान्य गोष्ट आहे, असे मोदी म्हणाले. त्यावर खर्गेंनीही बसल्या जागेवरून काहीतरी बोलण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर मोदींनी त्यांना उत्तर दिले.

असे आहे खर्गेजी, तुम्हाला तुमच्या घरात तर या गोष्टी ऐकायला मिळणार नाहीत. म्हणूनच मीच बोललो, असे बोलत मोदींनी खर्गेंची फिरकी घेण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर सभागृहात चांगलाच हशा पिकला हशा पिकला. खर्गेंच्या चेहऱ्यावर हसू उमटले. त्यानंतर पुढेही मोदींनी खर्गेंच्याच कवितेचा आधार घेत पुन्हा फिरकी घेतली.

Mallikarjun Kharge, Narendra Modi
PM Modi : युद्ध थांबवणाऱ्या पंतप्रधान मोदींना कोलंबियाने जे केलं ते का जमलं नाही? गुन्हेगारासारखी वागणूकीवर सरकार गप्प का?

खर्गेंनी राज्यसभेत भाषणादरम्यान काही कविता ऐकवल्या होत्या. त्याचा संदर्भ देत मोदी म्हणाले, खर्गेजी कविता वाचत होते. त्यांना माहिती होते कविता कधीची आहे. मनामध्ये काँग्रेसच्या स्थितीचा खूप त्रास होता. पण तिथे बोलू शकत नाही. त्यामुळे त्यांनी विचार केला, हे चांगले व्यासपीठ आहे, म्हणून इथे बोलले. त्यामुळे त्यांनी नीरज यांच्या कवितेच्या माध्यमातून त्यांच्याच घरातील हाल इथे मांडले.

पंतप्रधान मोदी एवढ्यावरच थांबले नाहीत. त्यांनी कवी नीरज यांच्या कवितेतील काही ओळी यावेळी ऐकवल्या. काँग्रेसची सत्ता असताना नीरज यांनी या कविता लिहिल्या होत्या. ‘है बहुत अंधियारा, अब सूरज निकलना चाहिए..!’ ही कविता ऐकवत मोदींना काँग्रेसवर टीका केली. जोपर्यंत काँग्रेसचा सूर्य चमकत राहिला, देश असाच अंधारात राहिला. अनेक दशके असेच हाल होते, असे मोदी म्हणाले. त्यावर खर्गेंनीही हे तुमच्याच काळात झाले, असे म्हटले.  

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com