"सरदार पटेल आणखी काही काळ असते तर..." गोवा मुक्तीदिनी मोदींना झाली आठवण

पंतप्रधान मोदींनी (PM Narendra Modi) कोकणी भाषेत गोव्यातील जनतेला गोवा मुक्तीदिनाच्या शुभेच्छा दिल्या.
Pm Narendra Modi in Goa Liberation Day 

Pm Narendra Modi in Goa Liberation Day 

ANI 

Published on
Updated on

पणजी : आज हिरक महोत्सवी गोवा मुक्ती दिन (Goa Liberation Day) साजरा केला जात आहे. या गोवा मुक्तीदिनाच्या समारोप सोहळ्याच्या निमित्ताने आज पंतप्रधान नरेंद्र मोदी गोवा दौऱ्यावर आले आहेत. यावेळी मोदी यांनी (PM Narendra Modi) गोमंतकीयांना संबोधित केले. या संबोधनात त्यांना प्रकर्षाने भारताचे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांची आठवण जाणवली. ते म्हणाले, सरदार वल्लभभाई पटेल अजून काही काळ जिवंत राहीले असते तर गोव्याला स्वातंत्र्यासाठी एवढा काळ लढा द्यावा लागला नसता.

यावेळी भाषणाच्या सुरुवातीला पंतप्रधान मोदींनी कोकणी भाषेत गोव्यातील जनतेला गोवा मुक्तीदिनाच्या (Goa Liberation Day) शुभेच्छा दिल्या. ते म्हणाले, गोव्याच्या भुमी, वातावरण आणि समुद्र हे सगळे प्रकृतीने अद्भुत वरदान दिले आहे. आज ६० वर्षातील संघर्ष आणि बलिदानाची गाथाही आपल्या समोर आहे. गोव्याच्या स्वातंत्र्यांचा हिरक महोत्सव आपल्या जीवनामध्ये खऱ्या अर्थाने बदल घडवून आणत आहे."

<div class="paragraphs"><p>Pm Narendra Modi in&nbsp;Goa Liberation Day&nbsp;</p></div>
कर्जतचं धुमशान : प्रचाराच्या शेवटच्या दिवशी रोहित पवारांना आर. आर. पाटलांची आठवण

पुढे बोलताना मोदी म्हणाले, गोव्याचा मुक्तीसंग्राम (Goa Liberation Day) खऱ्या अर्थाने संघर्ष आणि बलिदानाची कहाणी सांगतो. पोर्तुगिजांच्या ताब्यात असतानाही गोव्याने आपले गोवेपण जपले. त्याचबरोबर गोवा मुक्तीसंग्राम हे आपल्या इतिहासातील एक अमूर्त पान रोवले. गोव्याच्या स्वातंत्र्यासाठी गोव्यातील जनतेने आणि स्वातंत्र्य सेनानींनी आपल्या जीवची पर्वा न करता पोर्तुगिजांविरुध्द स्वातंत्र्यांचा लढा उभारला, बलिदान दिले. पण या लढाईत (Goa Liberation Day) सरदार वल्लभभाई पटेल अजून काही काळ जिवंत राहीले असते तर गोव्याला स्वातंत्र्यासाठी एवढा काळ लढा द्यावा लागला नसता.

<div class="paragraphs"><p>Pm Narendra Modi in&nbsp;Goa Liberation Day&nbsp;</p></div>
एकटे लढणार आणि स्वबळावर येवून दाखवणार : चंद्रकांतदादांनी शिवसेनेला ललकारले

यावेळी मोदी यांनी गोव्याचे दिवंगत मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांचेही स्मरण केले. ते म्हणाले, "मनोहर पर्रीकर यांनी खऱ्या अर्थाने गोव्याला विकासाच्या मार्गावर आणले. गोव्याच्या पर्यटन क्षेत्राला उभारी देण्यासाठी त्यांनी महान कार्य केले. तसेच केंद्र सरकारकडून पर्यटन क्षेत्राला लॉकडाऊन नंतर पुढे घेऊन जाण्यासाठी प्रयत्न करत असून नव नवे योजनाही राबवत आहे," असे म्हणून त्यांनी पर्रिकरांनंतरही आपले गोव्याच्या विकासाकडे लक्ष असल्याचे सांगितले. यावेळी त्यांनी गोव्यात राबविण्यात आलेल्या आणि येणाऱ्या विविध योजनांचा माहिती दिली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com