Samajwadi Party News : लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर उत्तर प्रदेशात मोठी राजकीय उलथापालथ होण्याची शक्यता आहे. समाजवादी पार्टीचे नेते स्वामी प्रसाद मौर्य यांनी काही दिवसांपूर्वीच महासचिव पदाचा राजीनामा दिला. त्यामुळे सपाचे प्रमुख अखिलेश यादव यांना मोठा धक्का बसला आहे. आता मौर्य नवीन पक्ष स्थापन करण्याच्या तयारीत असून, सपाला मोठे खिंडार पाडतील, अशी जोरदार चर्चा उत्तर प्रदेशात रंगली आहे. (Uttar Pradesh Political News)
स्वामी हे उत्तर प्रदेशातील दिग्गज नेते आहेत. मागील विधानसभा निवडणुकीपूर्वीच (Assembly Election) त्यांनी भाजपमधून (BJP) बाहेर पडत सपामध्ये प्रवेश केला होता. पण, त्यांचा निवडणुकीत पराभव झाला, त्यांच्यावर सपाच्या महासचिवपदाची जबाबदारी सोपवण्यात आली होती. पक्षात दुजाभाव केला जात असल्याचा आरोप करत त्यांनी नुकताच या पदाचा राजीनामा दिला आहे.
मौर्य यांनी आता नवा पक्ष स्थापन करण्याच्या हालचाली सुरू केल्या असून, 22 फेब्रुवारीला पक्षाची घोषणा करण्याची शक्यता आहे. उत्तर प्रदेशातील बहुजन नेते, प्रामुख्याने दलित, ओबीसी समाजातील नेत्यांना सोबत घेऊन ते पक्षाची बांधणी करू शकतात. त्यांच्यासोबत समाजवादी पक्षातील (Samajwadi Party) काही समर्थक माजी आमदार, खासदार, बिहारमधील काही नेतेही जाणार असल्याची चर्चा आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
दिल्लीतील तालकटोरा स्टेडियममध्ये वंचित संघर्ष समितीच्या बॅनरखाली ते कार्यक्रम आयोजित करणार असल्याचे समजते. तिथेच नव्या पक्षाची घोषणा केली जाईल. दरम्यान, मागील काही दिवसांत मौर्य यांनी केलेली अनेक विधाने वादग्रस्त ठरली. त्यापासून पक्षाने अंग काढून घेतले होते. त्यामुळे मौर्य नाराज झाल्याची चर्चा होती.
अखिलेश (Akhilesh Yadav) यांना लिहिलेल्या पत्रात त्यांनी अनेक मुद्द्यांवरून निशाणा साधला होता. पक्षाचा जनाधार वाढवण्यासाठी मी सातत्याने पर्यत्न केले. त्यामुळे आदिवासी, दलित, मागासवर्गीय समाजातील लोकांचा ओढा समाजवादी पक्षाकडे वाढला. यामध्ये माझे वैयक्तिक हित कसे, असा सवाल मौर्य यांनी केला होता.
R
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.