Marathi Sahitya Sammelan 2025 : मोदींनी उलगडले मराठी भाषेशी संघाचे नाते; दिल्लीतील संमेलनात पंतप्रधानांची मराठीतून फटकेबाजी

PM Narendra Modi 98th Akhil Bharatiya Marathi Sahitya Sammelan 2025 Delhi : दिल्लीतील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मराठी भाषाचे कौतुक केले आहे.
Narendra Modi Mohan Bhagwat
Narendra Modi Mohan Bhagwatsarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या 98 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन दिल्ली इथं झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थित या संमेलनाचे उद्घाटन झाले.

पंतप्रधान मोदींनी यावेळी केलेल्या भाषणात मराठी भाषेचे कौतुक करताना, काही ठिकाणी मराठीतून साधलेला संवादाचे कौतुक झाले. मराठी भाषेचे कौतुक करताना राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि मराठी भाषेशी नाते पंतप्रधानांनी उलगडले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी त्यांच्या भाषणाची सुरवात, देशाच्या आर्थिक राजनाधीच्या राज्यातून, देशाच्या राजधानीत आलेल्या सर्व मराठी सारस्वतांना नमस्कार, असे म्हणत केली. यावेळी सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडात झाला. दिल्लीत मराठी भाषेचे कौतुकाचा आनंद आहे. मराठी साहित्यात स्वातंत्र्यांच्या लढाईचा सुगंध आहे. महाराष्ट्र आणि राष्ट्राची सांस्कृतिक वारसा आहे. ज्ञानबा-तुकारामांच्या मराठीला आज राजधानी दिल्ली अतिशय मनापासून अभिवादन करते, असे म्हणत उपस्थितांची मनं जिंकली.

Narendra Modi Mohan Bhagwat
Eknath Shinde : 'जितना जलोगे, जल कर एक दिन...'; दिल्ली सत्कारावरील टीकेला एकनाथ शिंदेंचा शेरो शायरीतून 'उबाठा'ला टोला

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी निवडलेल्या दिवसाचै कौतुक करताना, जागतिक मातृभाषा दिवस असल्याची आठवण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी करून दिली. दिल्लीतील (Delhi) साहित्य संमेलनासाठी दिवस देखील चांगला निवडला आहे. मी नेहमीच मराठी भाषेविषयी विचार करतो. संत ज्ञानोबांची ओवी, 'माझा मराठीची बोलू कौतुके। परि अमृतातेहि पैजासी जिंके।', असे म्हणत अमृतापेक्षा मराठी गोड आहे. माझे मराठी भाषा, संस्कृतीविषयी असलेले प्रेम सर्वांना माहित आहे. मराठी बोलण्याचा माझा प्रयत्न आणि नवीन शब्द नेहमीच शिकत असतो, असे पंतप्रधान मोदींनी सांगितले.

Narendra Modi Mohan Bhagwat
Eknath Shinde : ''उबाठा'ची स्थिती म्हणजे, तुम लड़ो हम कपड़े संभालते हैं'; एकनाथ शिंदेंनी ठाकरेंच्या शिवसेनेची उडवली खिल्ली

मराठी भाषेचे हे संमेलन, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेकाचे 350 वर्ष पूर्ण होत आहे. पुण्यश्लोक अहिल्याबाई जन्म जयंतीचे 300 वर्ष होत आहे. बाबासाहेब आंबेडकर यांनी बनवलेल्या संविधानाने देखील 75 वर्ष पूर्ण होताना होत आहे, असे सांगून राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि मराठी भाषेचे नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उलगडले.

'महाराष्ट्रात मराठी भाषिकाने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना केली होती. हा संघ वटवृक्ष झाला आहे. तो शब्तादी साजरी करतो आहे. वेदापासून विवेकानंदपर्यंतचे विचारांचा यज्ञ नवीन पिढीपर्यंत पोचवत आहे. माझ्यासह लाखो लोकांना संघाने देशासाठी जगण्याची प्रेरणा दिली आहे. संघामुळे मराठी भाषाला जोडण्याचे सौभाग्य लाभले आहे', असे म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मराठी भाषेचे कौतुक केले.

याच काळात काही महिन्यापूर्वी मराठी भाषाला अभिजात भाषांचा दर्जा मिळाला. याचा निर्णय माझ्या काळात झाला, हे माझ्यासाठी सौभाग्य आहे. भाषा संवादाबरोबर संस्कृती सांगते. भाषा समाज निर्मित महत्त्वाची ठरते, असेही पंतप्रधानांनी आवर्जून सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com