
Mumbai News : शिवसेना नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर गोंदिया मेळाव्यातून जोरदार टीकास्त्र सोडले.
"गेल्या काही वर्षांत शिवसेनेत, तुम लड़ो हम कपड़े संभालते हैं, तो एकनाथ शिंदे नाही, तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहणारा आहे. शाखाप्रमुख, नगरसेवक ते राज्याचा मुख्यमंत्री बनतो. मग तुमच्या पोटात का दुःखतं? शेतकरी, सर्वसामान्यांच्या पोरानं मुख्यमंत्री होऊ नये का?", असा सवाल करत एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची खिल्ली उडवली.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आज गोंदिया दौऱ्यावर आहेत. तिथं शिवसेनेचा पक्ष मेळावा झाला. स्थानिक माजी आमदारांसह अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी शिवसेनेत पक्षप्रवेश केला. यानंतर एकनाथ शिंदे यांनी भाषणात जोरदार बॅटिंग करत, उद्धव ठाकरेंना टार्गेट केले.
एकनाथ शिंदे म्हणाले, "बाळासाहेब शिवसैनिकाच्या पाठीशी ठामपणे उभे राहायचे. पण गेल्या काही वर्षांत, तुम लड़ो हम कपड़े संभालते हैं, अशी परिस्थिती होती. एक सर्वसामान्य शेतकरी (Farmer) कुटुंबांतील पोरगा, शाखाप्रमुख, नगरसेवक ते राज्याचा मुख्यमंत्री बनतो. तेव्हा का दुःखतं, का दुःखतं तुमच्या पोटात?" आम्ही सोन्याचा चमचा घेऊन जन्माला नाही आलो. परंतु सर्वसामान्यांच्या जीवनात सोन्यासारखे दिवस आणायला आम्ही जन्म घेतला आहे, असा टोला एकनाथ शिंदे यांनी लगावला.
'लोकं त्यांना सोडून चालले की, तर लगेच कचरा, गद्दार, असे म्हणता. पण ही लोक का येत आहेत, याचे आत्मचिंतन, आत्मपरिक्षण करा. लोकांचे प्रेम मिळत आहे. गुंतवणूकदारांना विश्वास आहे, म्हणून लोक आमच्याकडे येत आहे. आम्ही कोणाला फोडत नाही. त्यामुळे काही जण आम्हाला फोडण्याची भाषा करत आहेत, डोकी फोडण्याची भाषा करत आहे. पण त्यांच्या मागे कोणीच नाही, त्यांनी आव्हान देऊ नये', असा घणाघात एकनाथ शिंदे यांनी केला.
विधानसभा निवडणुकीत जसा पराभव झाला, तसाच त्यांचा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत पराभव होणार आहे. जनतेने त्यावर शिक्कामोर्तब केला आहे. माझ्या लाडकी बहिणींची योजना बंद होणार नाही, म्हणजे नाही. एसटीमधील महिलांची 50 टक्के योजना बंद होणार नाही. ज्येष्ठांना सवलती बंद होणार नाही. राज्य आणि केंद्रातील योजना सुरू राहणार आहे, असल्याचे एकनाथ शिंदे यांनी ठामपणे सांगितले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.