Eknath Shinde : 'जितना जलोगे, जल कर एक दिन...'; दिल्ली सत्कारावरील टीकेला एकनाथ शिंदेंचा शेरो शायरीतून 'उबाठा'ला टोला

DCM Eknath Shinde Sharad Pawar Delhi Gondia ShivSena : दिल्ली इथं शरद पवार यांच्या हस्ते झालेल्या सत्कारावरून उबाठाकडून होणाऱ्या टीकेला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे जोरदार प्रत्युत्तर दिले.
Uddhav Thackeray and Eknath Shinde
Uddhav Thackeray and Eknath Shindesarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : दिल्लीत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याहस्ते सत्कार झाला. महाजी शिंदे राष्ट्रगौरव पुरस्कार देऊन हा सन्मान झाला.

शरद पवार यांनी शिंदेंचा दिल्लीत केलेल्या या सत्कारावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी नाराजी भावना व्यक्त केली. संजय राऊत पुढंही या भूमिकेवर ठाम राहिले. एकनाथ शिंदे यांनी उबाठाला गोंदिया इथल्या शिवसेना मेळाव्यातून शेरो शायरीतून जोरदार उत्तर दिलं.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, "दिल्लीमध्ये (Delhi) महादजी शिंदे राष्ट्रगौरव पुरस्कार दिला. महादजी शिंदे महापराक्रमी होते. त्यांच्या नावाचा पुरस्कार मिळणे अभिमानाची बाब आहे. परंतु इथं पोटदुखी सुरू झाली. 'उबाठा'च्या पोटात चांगली कळ आली. जितना जलोगे, जल कर एक दिन खुद ही राख हो जाओगे, अशी परिस्थिती झाली आहे".

Uddhav Thackeray and Eknath Shinde
Eknath Shinde : ''उबाठा'ची स्थिती म्हणजे, तुम लड़ो हम कपड़े संभालते हैं'; एकनाथ शिंदेंनी ठाकरेंच्या शिवसेनेची उडवली खिल्ली

'पुरस्कार मला मिळाला. अमित शाह, शरद पवार (Sharad Pawar), महादजी शिंदे, साहित्यिकांचा अपमान केला. तुम्ही सगळ्यांचा अपमान केला. कुठे फेडणार हे पाप. एकनाथ शिंदे डरनारा नाही', असे देखील उपमुख्यमंत्री शिंदेंनी ठणकावले.

Uddhav Thackeray and Eknath Shinde
Representation People Act 1951 : कृषीमंत्री कोकाटेंची आमदारकी धोक्यात; लोकप्रतिनिधी कायदा काय सांगतो?

धमक्यांवर शिंदे म्हणाले...

धमकीच्या आलेल्या मेलवर एकनाथ शिंदे म्हणाले, "एकनाथ शिंदे कोणत्याही धमकीला घाबरत नाही. मी बाळासाहेब, दिघेसाहेबांचा शिवसैनिक आहे. दिघेसाहेब असताना डान्सबार, लेडीज बार बंद केले. तेव्हा देखील खूप धमक्या आल्या. जेव्हा मी गडचिरोलीचा पालकमंत्री होतो, तेव्हा देखील नक्षलवाद्यांनी धमक्या दिल्या. नक्षलवाद्यांना कंठस्नान घालण्याचे काम गडचिरोलीच्या पोलिसांनी केले. त्याचा मला अभिमान आहे. सगळ्या धमक्यांना पुरून उरणारा, एकनाथ शिंदे आहे".

दाढीच्या केसालाही...

'कोरोना काळात दोनदा कोविड झाला. तरी मागे हटलो नाही. लाडक्या बहिणी, जनता पाठीशी आहे, तोपर्यंत माझ्या जीवाला सोडा, दाढीच्या केसाला कोणी धक्का लावू शकणार नाही. कुणाची हिंमत नाही', असेही एकनाथ शिंदे यांनी म्हटले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com