PM Narendra Modi News : मॉर्निंग कन्सल्ट या अमेरिकन कंपनीने ग्लोबल लीडर अप्रूव्हल लिस्ट (जागतिक नेते मान्यता यादी) जारी केली आहे. विशेष म्हणजे या यादीत भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी या पुन्हा एकदा अव्वल ठरले आहेत. पीएम मोदींना ७६ टक्के मान्यता मिळाली आहे. त्याच वेळी, मेक्सिकोचे अध्यक्ष आंद्रेस मॅन्युएल लोपेझ ओब्राडोर हे 61 टक्के मान्यता रेटिंगसह या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहेत. ( PM Narendra Modi tops global leader approval list, surpassing superpower countries )
मॉर्निंग कन्सल्टच्या या यादीत ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज तिसऱ्या क्रमांकावर आहेत. त्यांना 55 टक्के जागतिक नेते मान्यता रेटिंग मिळाली आहे. त्याच वेळी, इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांना 49 टक्के रेटिंग मिळाली असून त्या यादीत मेलोनीने चौथ्या क्रमांकांवर आहेत. याशिवाय ग्लोबल लीडर अप्रूव्हल रेटिंगच्या यादीत, ब्राझीलचे अध्यक्ष लुला डी सिल्वा यांनाही जॉर्जिया मेलोनीप्रमाणेच 49 टक्के रेटिंग मिळाले आहे.
जगातील सर्वात मोठी महासत्ता म्हणून ओळखले जाणारे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन मात्र ग्लोबल लीडर अप्रूव्हल रेटिंगच्या यादीत सहाव्या क्रमांकावर घसरले आहेत. बायडेन यांना केवळ 41 टक्के मंजूरी रेटिंग मिळाली आहे. कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांना 39 टक्के मान्यता रेटिंगसह ते सातव्या क्रमांकावर आहेत. स्पेनचे पंतप्रधान पेड्रो सांचेझ यांना ३८ टक्के मान्यता मिळाली असून ते या यादीत ८व्या क्रमांकावर आहेत.ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक दहाव्या क्रमांकावर आहेत. त्यांची मान्यता रेटिंग 34 टक्के आहे.
मॉर्निंग कन्सल्ट ही एक अमेरिकन कंपनी आहे, या कंपनीने पंतप्रधान नरेंद्र मोदींचे जागतिक नेत्यांमध्ये सर्वात शक्तिशाली नेते असे वर्णन केले आहे. ही कंपनी २०१४ मध्ये सुरू झाली, ज्या वर्षी नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले. या कंपनीचे काम जागतिक स्तरावर डेटा इंटेलिजन्सचे आहे. मॉर्निंग कन्सल्ट ही सर्वात वेगाने वाढणारी तंत्रज्ञान आधारित कंपनी मानली जाते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.