Varanasi Election Vote Counting: वाराणसीमध्ये अजूनही मतमोजणी सुरूच, भाजप उमेदवाराने निकालाआधीच पराभव केला मान्य

Varanasi Election News: BJP Candidate Concedes Defeat Before Official Results : मतमोजणीदरम्यान मोठा गोंधळ झाला होता. त्यामुळे भाजप उमेदवाराने फेरमतमोजणीची मागणी केली होती. त्यानुसार निवडणूक अधिकाऱ्यांकडून फेरमतमोजणीचा निर्णय घेण्यात आला.
Varanasi Election Counting Result
Varanasi Election Counting ResultSarkarnama
Published on: 
Updated on: 

Varanasi MLC Election update : देशातील शिक्षक व पदवीधर मतदारसंघाच्या २७ जागांचे निकाल अधिकृतपणे जाहीर करण्यात आले आहेत. मात्र, अजूनही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मतदारसंघ असलेल्या वाराणसीमध्ये पदवीधर मतदारसंघाची मतमोजणी सुरू आहे. या मतदारसंघात समाजवादी पक्षाच्या उमेदवाराने मोठी आघाडी घेतली असून अधिकृत निकाल जाहीर होण्याआधीच भाजप उमेदवाराने पराभव मान्य केला आहे.

भाजपचे उमेदवार केदारनाथ सिंह यांनी काही वेळापूर्वीच सोशल मीडियात पोस्ट करत निकाल स्वीकारला आहे. त्यांच्याविरोधात समाजवादी पक्षाचे उमेदवार आशुतोष सिन्हा हे रिंगणात आहेत. सिन्हा हे या मतदारसंघातील विद्यमान आमदार आहेत. हा मतदारसंघ पंतप्रधानांच्या लोकसभा मतदारसंघातील असल्याने निकालाकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले होते.

मतमोजणीदरम्यान मोठा गोंधळ झाला होता. त्यामुळे भाजप उमेदवाराने फेरमतमोजणीची मागणी केली होती. त्यानुसार निवडणूक अधिकाऱ्यांकडून फेरमतमोजणीचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे अजूनही मतमोजणी सुरू आहे. सध्या दुसऱ्या क्रमांकाच्या मतांची मोजणी सुरू आहे. पण मोजणी पूर्ण होण्याआधीच जवळपास १७ हजार मतांनी पिछाडीवर असलेल्या केदारनाथ सिंह यांनी पराभव मान्य केला.

Varanasi Election Counting Result
MLC Election Result : PM मोदींकडून काँग्रेसची खिल्ली, पण नाचक्कीपासून पुन्हा विदर्भातील 'बब्बर शेर'नेच वाचविले; नेत्यांना आठवला असेल 7 वर्षांपूर्वीचा इतिहास

भावनिक पोस्टमध्ये सिंह म्हणाले, 'मी जनतेने दिलेला कौल पूर्ण नम्रतेने स्वीकारतो. या निवडणुकीत अपेक्षित यश मिळवता आले नसले, तरी तुम्हा सर्वांकडून मिळालेले प्रेम, सहकार्य आणि विश्वास माझ्यासाठी महत्वाचे आहे.' दरम्यान, मतमोजणी सुरू असताना भाजप घोळ घालू शकते, अशी भीती व्यक्त करत समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी मतमोजणीवर बारकाईने लक्ष ठेवण्याचे आदेश नेत्यांना दिले होते.

Varanasi Election Counting Result
Top 10 News : लाडक्या बहिणींची दिवाळी गोड, विदर्भातील 'बब्बर शेर'नेच काँग्रेसला तारले, पराभव जिव्हारी लागला अन् नेत्याने शिक्षकांची लायकी काढली... वाचा महत्त्वाच्या घडामोडी!

उत्तर प्रदेशातील एकूण ११ जागांसाठी मतदान झाले. सर्व जागांवर भाजप विरुध्द समाजवादी पक्ष अशी थेट लढत होती. भाजपला एकूण सहा जागा मिळाल्या असून समाजवादी पक्षाने आतापर्यंत चार जागांवर विजय मिळविला आहे. वाराणसी पदवीधरच्या निकालाची आता केवळ औपचारिकताच बाकी असून ही जागाही सपाच्या नावावर होणार, हे निश्चित आहे. त्यामुळे सपाच्या खात्यात एकूण पाच जागा असतील.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com