MLC Election Result : PM मोदींकडून काँग्रेसची खिल्ली, पण नाचक्कीपासून पुन्हा विदर्भातील 'बब्बर शेर'नेच वाचविले; नेत्यांना आठवला असेल 7 वर्षांपूर्वीचा इतिहास

Abhijeet Vanjari, Nagpur Graduate Constituency, Narendra Modi, Maharashtra Legislative Council election : खरंतर विधानसभा, लोकसभा निवडणूक आणि शिक्षक, पदवीधर निवडणुकीच्या निकालांची तुलना होऊ शकत नाही. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदींनीच सोशल मीडियात पोस्ट करत काँग्रेसची खिल्ली उडविल्याने या निवडणुकीच्या निकालाला देशाच्या राजकारणात महत्व प्राप्त झाले.
PM Modi And Rahul Gandhi
PM Modi And Rahul GandhiSarkarnama
Published on: 
Updated on: 

Congress vs BJP politics : देशातील चार राज्यांत पार पडलेल्या २८ शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत काँग्रेसला केवळ एका जागेवर समाधान मानावे लागले आहे. पण हा विजय मिळण्याआधीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह संपूर्ण भाजपने काँग्रेसची खिल्ली उडविली. काँग्रेसला भोपळाही फोडता आला नाही, काँग्रेसची नाचक्की झाली, अशा पोस्ट सोशल मीडियात व्हायरल झाल्या. पण नागपूर पदवीधर मतदारसंघातून अभिजीत वंजारी यांनी विजय मिळवत काँग्रेसची लाज राखली.

विद्यमान आमदार असलेल्या वंजारी यांच्यासाठी यंदाची निवडणूक कठीण वाटत होती. नितेश कराळे यांच्या उमेदवारीचा मोठा फटका त्यांना बसला. पण त्यांच्यामुळेच दुसऱ्या क्रमांकाच्या मतांमध्येही ते आघाडीवर राहिले. भाजपच्या सुधाकर कोहळे या मतांमध्ये मागे पडले अन् त्यांचा पराभव झाला. राजकारण काहीही घडो, पण वंजारी यांच्या विजयाची देशात चर्चा होतेय. देशभरातील काँग्रेसचे नेते वंजारी यांच्या विजयाकडे बोट दाखवत पंतप्रधान मोदींसह भाजपवर निशाणा साधत आहेत.

नेत्यांना आठवला असेल ७ वर्षांपूर्वीचा इतिहास

लोकसभेच्या २०१९ च्या निवडणुकीत देशभरात काँग्रेसची धुळधाण झाली होती. पक्षाला केवळ ५२ जागांवर समाधान मानावे लागले होते. केवळ पंजाब आणि तामिळनाडू या राज्यांमध्ये प्रत्येकी आठ खासदार निवडून आल्याने काँग्रेसला किमान अर्धशतक पार करता आले होते. महाराष्ट्रासारख्या मोठ्या राज्यात काँग्रेसला केवळ एकच जागा मिळाली होती. विदर्भातील चंद्रपूर मतदारसंघातून सुरेश धानोरकर निवडून आले होते. त्यांच्या विजयामुळे राज्यात काँग्रेसची नाचक्की टळली होती. आता विधानपरिषदेच्या निवडणुकीत देशातील २८ जागांपैकी काँग्रेसला केवळ विदर्भातील एका जागेनेच तारले आहे.

PM Modi And Rahul Gandhi
भाजपच्या तिकीटावर 29 व्या वर्षी आमदार, आता 'या' महिला नेत्या थेट राष्ट्रीय राजकारणात

खरंतर विधानसभा, लोकसभा निवडणूक आणि शिक्षक, पदवीधर निवडणुकीच्या निकालांची तुलना होऊ शकत नाही. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदींनीच सोशल मीडियात पोस्ट करत काँग्रेसची खिल्ली उडविल्याने या निवडणुकीच्या निकालाला देशाच्या राजकारणात महत्व प्राप्त झाले. त्याचे कारण म्हणजे सध्या काँग्रेसकडून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार आणि केंद्र सरकारविरोधात आवाज उठविला जात आहे. देशात सातत्याने आंदोलने केली जात आहेत. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी अत्यंत आक्रमकपणे हल्ला चढवत आहेत.

विधानपरिषदेच्या निवडणुकीत त्याचे पडसाद उमटतील, अशी आशा इंडिया आघाडीला होती. मात्र, या निवडणुकीत काँग्रेसला करिष्मा दाखविता आला नाही. महाराष्ट्र वगळता कर्नाटक, उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये एनडीए वरचढ ठरली. सत्ता असलेल्या कर्नाटकसह बिहारमध्ये राज्यांत काँग्रेसला एकही जागा मिळाली नाही. यूपीमध्ये काँग्रेसने एकही जागा लढविली नव्हती. त्यामुळे खरेतर एकूण निकालात या जागांचा समावेश करता येणार नाही. असे असले तरी महाराष्ट्र, कर्नाटक आणि बिहारमध्ये काँग्रेसचा प्रत्येकी एक विद्यमान आमदार पराभूत झाला आहे. ही पक्षासाठी नामुष्की आहे.

PM Modi And Rahul Gandhi
वडिलांची राहुल गांधींशी हातमिळवणी; भाजपमधील माजी खासदार लेकीवर संशयाची सुई...

ईव्हीएम की मतपत्रिका?

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काँग्रेसच्या पराभवावर पोस्ट करताना पुन्हा ईव्हीएम आणि बॅलेट पेपर असा वाद सुरू केला आहे. त्यांनी मतपत्रिकांवर मतदान होऊनही काँग्रेसचा पराभव झाल्याकडे लक्ष वेधले आहे. मात्र, खरेतर सध्या काँग्रेस ईव्हीएमपेक्षा निवडणूक आयोगाच्या भूमिकेवरून आक्रमक झाली आहे. ज्ञानेश कुमार यांचा राजीनामा, निवडणूक आयुक्तांची निवडप्रक्रिया, एसआयआरमधील कथित गडबड या मुद्यांना लक्ष करत आहे. पण पंतप्रधानांनी बॅलेट पेपरचा मुद्दा काढत काँग्रेसला डिवचले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com