NCP Split News : राष्ट्रवादीच्या पाच आमदारांच्या अपात्रतेबाबतची कार्यवाही लवकरच? नीलम गोऱ्हेंकडून पुढील आठवड्यात...

Maharashtra Politics : आमदार सतीश चव्हाण, अमोल मिटकरी, विक्रम काळे, रामराजे नाईक निंबाळकर आणि अनिकेत तटकरे यांच्याविरोधात नीलम गोऱ्हे यांच्याकडे तक्रार केली आहे.
NCP Split News
NCP Split News Sarkarnama
Published on
Updated on

Mumbai : राष्ट्रवादीत दोन गट पडल्यानंतर कुठला आमदार कोणत्या गटात आहे, असा संभ्रम नागरिकांमध्ये आहे. पक्ष आणि चिन्ह यावर दोन्ही गटांनी न्यायालयात धाव घेतली असताना नवीन बातमी समोर येत आहे.

अजित पवार गटातील पाच आमदारांच्या विरोधात शरद पवार गटाने विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्याकडे तक्रार दाखल केली आहे. त्यामुळे या पाच आमदारांच्या कार्यवाहीबाबतची प्रक्रिया सुरूहोण्याची शक्यता नाकारता येत नाही.

NCP Split News
Amol Kirtikar News : गजानन कीर्तीकरांची शिंदे-भाजपला साथ, तरीही पुत्र अमोल कीर्तीकरांच्या मागे चौकशीचा ससेमिरा सुरूच...

राष्ट्रवादीचे (शरद पवार गट) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी अजित पवार गटाचे विधान परिषदेतील आमदार सतीश चव्हाण, अमोल मिटकरी, विक्रम काळे आणि अनिकेत तटकरे यांच्याविरोधात नीलम गोऱ्हे यांच्याकडे तक्रार केली होती.

तर शरद पवार गटातील नेते, माजी मंत्री जितेंद्र आव्हाडांनी विधान परिषदेचे आमदार रामराजे नाईक निंबाळकर यांच्याविरोधात याचिका दाखल केली होती. या आमदारांनी बाजू मांडावी, म्हणून त्यांना उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्याकडून पुढील आठवड्यात नोटीस बजावली जाणार असल्याची माहिती आहे.

NCP Split News
Womens Empowerment News : मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियान २४ तासांतच स्थगित; सक्षम अधिकाऱ्याच्या नेमणुकीची प्रतीक्षा

तर दुसरीकडे पक्षविरोधी कृत्य करणाऱ्या राष्ट्रवादीच्या शरद पवार गटातील आमदारांना तत्काळ निलंबित करण्यात यावे, अशी मागणी मूळ राष्ट्रवादी म्हणून अजित पवार गटानं विधिमंडळाच्या अध्यक्षांकडे केली आहे. त्यामुळे आता दोन्ही गटांतील संघर्ष आणखी वाढण्याची चिन्हे आहेत.

राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्हाचा वाद आता निवडणूक आयोगात पोहोचला आहे. त्यावर सहा ऑक्टोबरला सुनावणी होणार आहे. अजित पवार गटाच्या वतीनं दाखल करण्यात आलेल्या याचिकेबाबत ही सुनावणी होईल. सहा तारखेच्या सुनावणीत शरद पवार गट आणि अजित पवार गट हे दोन्ही गट आपली भूमिका निवडणूक आयोगासमोर मांडणार आहेत.

NCP Split News
India Alliance News : मुख्यमंत्र्यांच्या बालेकिल्ल्यात आज INDIAची सभा; रोहित पवार, आव्हाडांच्या निशाण्यावर कोण?

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com