Dhangar Samaj Aarakshan: सुरेश बंडगर उपोषणावर ठाम; म्हणाले,'पत्नीचं कुंकू पुसून आलोय... प्राण गेले तरी चालेल'

Suresh Bandgar Andolan: सुरेश बंडगर यांची तब्येत बिघडल्याने त्यांना उपोषणस्थळीच ऑक्सिजन लावण्यात आला आहे.
Dhangar Reservation
Dhangar Reservation Sarkarnama
Published on
Updated on

Nagar Dhangar Reservation: धनगर समाजाला एसटी (ST) संवर्गामध्ये सामावून घ्यावे, या मागणीसाठी यशवंत सेनेकडून गेल्या पंधरा दिवसांपासून चौंडीत आमरण उपोषण आंदोलन सुरू आहे. उपोषणकर्ते सुरेश बंडगर यांची तब्येत बिघडल्याने त्यांना उपोषणस्थळीच ऑक्सिजन लावण्यात आला आहे.

Dhangar Reservation
NCP Split News : राष्ट्रवादीच्या पाच आमदारांच्या अपात्रतेबाबतची कार्यवाही लवकरच? नीलम गोऱ्हेंकडून पुढील आठवड्यात...

मुंबई येथे धनगर समाजाच्या आरक्षणासंदर्भात महत्त्वाची बैठक नुकतीच झाली. मात्र, ही बैठक निष्फळ ठरल्याने चौंडी येथील उपोषणकर्ते आंदोलनावर ठाम आहेत. "गेलो तर समाजाचा, आलो तर तुझा" असे पत्नीला सांगून आलोय," असे सुरेश बंडगर यांनी सांगितलंय. प्राण गेले तरी चालेल, मात्र जोपर्यंत आरक्षणाचा प्रश्न मिटत नाही तोपर्यंत आम्ही उठणार नाही, अशी भूमिका यशवंत सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली आहे.

धनगर आरक्षणाच्या मुद्द्यावर चौंडीत उपोषण सुरू आहे.आज उपोषणाचा 17 वा दिवस आहे. या आंदोलनात अण्णासाहेब रुपनर आणि सुरेश बंडगर यांची प्रकृती बिघडली आहे. हॉस्पिटलमध्ये उपचार घेण्यास त्यांनी नकार दिला आहे. येत्या काळात भाजपला पायउतार केल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा सुरेश बंडगर यांनी दिला आहे.

अण्णासाहेब रुपनवर यांची प्रकृती खालावल्याने त्यांना पुण्यातील ससून रुग्णालयात हलवण्यात आले. त्यांना 15 तारखेला प्रथम अहमदनगर जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आणि त्यानंतर चार दिवसांनी त्यांना पुण्याला हलवण्यात आले. त्यानंतर सुरेश बंडगर यांची तब्येतही खालावली आहे. भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी ससून रुग्णालयात जाऊन रुपनवर यांची भेट घेतली.

Dhangar Reservation
Amol Kirtikar News : गजानन कीर्तीकरांची शिंदे-भाजपला साथ, तरीही पुत्र अमोल कीर्तीकरांच्या मागे चौकशीचा ससेमिरा सुरूच...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com