Hiren Joshi Controversy : नरेंद्र मोदींचे PMO तील खास अधिकारी हिरेन जोशींबाबत मोठी अपडेट, हकालपट्टी, राजीनामा की..., मोठ्या पत्रकाराने सगळं सांगितलं

Hiren Joshi Narendra Modi PMO : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कान अन् डोळे म्हणून परिचित असलेले अधिकारी हितेन जोशी यांची PMO मधून हकालपट्टी झाल्याचा दावा काँग्रेस नेत्यांनी केला आहे. मात्र, या संदर्भात मोठी अपडेट समोर आली आहे.
Prime Minister Narendra Modi with PMO officer Hiten Joshi during an official engagement.
Prime Minister Narendra Modi with PMO officer Hiten Joshi during an official engagement.sarkarnama
Published on
Updated on

Hiren Joshi News Update : पंतप्रधान कार्यालयातील अधिकारी हिरेन जोशी यांची हकालपट्टी झाल्याचा दावा काँग्रेस नेत्यांकडून करण्यात आला होता. पंतप्रधान मोदींच्या सोशल मीडियाची जबाबदारी हिरेश जोशी यांच्यावर आहे. दिल्लीच्या राजकीय वर्तुळात जोशी हे पंतप्रधानांचे कान अन् डोळे म्हणून परिचित आहेत. त्यांच्याबद्दल काँग्रेस नेते पवन खेरा यांनी केलेल्या दाव्याने एकच खळबळ उडाली होती.

तब्बल 18 वर्षांपासू मोदींसोबत असलेले हिरेन जोशी यांनी राजीनामा दिल्याचे देखील बोलले जात होते. मात्र, वरिष्ठ पत्रकार राजदीप सरदेसाई यांनी एका हिंदी युट्यूब चॅनेलशी संवाद साधताना या सगळ्या अफवा असल्याचे म्हटले आहे. त्यांनी सांगितले की, जोशी यांच्या जवळील व्यक्तीसोबत त्यांचा संवाद झाला. त्यांनी मेसेज करून सांगितले की, हिरेन जोशी आहेत तेथेच आहेत.

दावा करण्यात येत आहे की, पीएमओच्या वेबसाईटवर अजुनही हिरेन जोशी यांचे नाव ओएसडी म्हणून कायम आहे. त्यामुळे माध्यमांमध्ये ज्या चर्चा आहेत की हिरन जोशी यांनी पीएओ कार्यालय सोडले त्यामध्ये तथ्य नाही. राजदीप सरदेसाई यांनी दावा केली आहे की, भाजपमध्ये नरेंद्र मोदी, अमित शाह यांच्यानंतर नंबर तीनवर सर्वात शक्तिशाली कोण असेल तर ते हिरेन जोशी आहे.

Prime Minister Narendra Modi with PMO officer Hiten Joshi during an official engagement.
'पंतप्रधान कार्यालयात 'जुगार'; PM मोदींचा उजवा हात समजल्या जाणाऱ्या जोशींसह तिघांची उचलबांगडी; भाजपने लाज सोडली सट्टेबाज माफियांना...', ठाकरेंचा हल्लाबोल

हिरेन जोशी हे इंजिनिअरींगेच प्राध्यापक होते. मात्र, एका कार्यक्रमात ते तत्कालीन गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांना भेटले. त्या कार्यक्रम तांत्रिक अडचण निर्माण झाल्यानंतर ती सोडवण्यासाठी हिरेन जोशी हे समोर आले होते. अवघ्या काही मिनिटांत त्यांनी ती अडचण सोडवल्याचे सांगितले जाते. त्यानंतर मोदींनी त्यांना स्वतःसोबत काम करण्यास सांगितले. तेव्हापासून ते मोदींसोबत असल्याचे सांगितले जाते.

मोदींची डिजिटल प्रतिमा...

नरेंद्र मोदी हे गुजरातचे मुख्यमंत्री होती तेव्हा मुख्यमंत्री कार्यालयता हिरेन जोशी यांना जबाबदारी देण्यात आली होती. मोदींची डिजिटल माध्यमावर प्रतिमा बळकट करण्याची रणनिती जोशी यांनी आखली होती. त्यात त्यांना यश मिळाले. मोदींची डिजिटल रणनीती काय असावी यामागे देखील जोशी असल्याचे सांगितले जाते. ते मोदींच्या अत्यंत विश्वासू आणि जवळच्या सहकार्यांपैकी एक म्हणून ओळकले जातात. मोदी हे 2014 ला पंतप्रधान झाल्यानंतर त्यांच्यासोबत जोशी हे देखील दिल्लीला आले. आता त्यांच्यावर PMO कार्यालयात कम्युनिकेशन्स आणि आयटी विभागाचे ओएसडी म्हणून जबाबदारी आहे.

Prime Minister Narendra Modi with PMO officer Hiten Joshi during an official engagement.
Beed Crime : बीड पोलिसांचा गावगुंडांना दणका : हवेत फैरी, पिस्तुलीबरोबर स्टायलिश रिल्स् काढणाऱ्यांना बसणार चाप

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com