Hiren Joshi Controversy : पंतप्रधान मोदींचे कान-डोळे असलेल्या अधिकाऱ्याची PMO मधून हकालपट्टी? दिल्लीच्या राजकारणात खळबळ

PMO Hiren Joshi Pawan Khera : पंतप्रधान कार्यालायतील अधिकारी हिरेन जोशी यांची हकालपट्टी करण्यात आली असल्याचा दावा काँग्रेस प्रवक्ते पवन खेरा यांना केला आहे.
Narendra Modi
Narendra ModiSarkarnama
Published on
Updated on

Hiren Joshi News : दिल्लीमध्ये लोकसभेचे अधिवेशन सुरू असतानाच पंतप्रधान कार्यालयात (PMO) मोठ्या घडामोडी घडत असल्याची चर्चा आहे. काँग्रेस नेते आणि प्रवक्ते पवन खेरा यांनी पत्रकार परिषद घेत पंतप्रधान कार्यालयातील प्रमुख अधिकारी असलेले हिरेन जोशी यांची अचानक हकालपट्टी करण्यात आली असल्याचा दावा केला आहे.

हिरेन जोशी हे प्रधानमंत्री कार्यालयात कम्युनिकेशन्स आणि आईटी विभागाचे ओएसडी (ऑफिसर ऑन स्पेशल ड्यूटी) असल्याचे सांगितले जाते. दिल्लीच्या वर्तुळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे डोळे आणि कान असलेले अधिकारी म्हणून हिरेन जोशी परिचित आहेत.

पवन खेरा म्हणाले की, हिरेन जोशी हे पंतप्रधान कार्यालयात बसून काही बिझनेस देखील करत होते. त्यांचा बेटींग अ‍ॅपमध्ये भागीदारी असल्याचा संशय आहे. परदेशात देखील त्यांच्या बिझनेसच्या लिंक आहेत का? याचा तपास झाला पाहिजे.

Narendra Modi
Deepak Kesarkar : भाजप-शिवसेनेत राडा, मुख्य सुत्रधार शिंदेंचा आमदारच; पैसे वाटपाचे आमच्याकडेही पुरावे म्हणत ठाकरेंच्या शिलेदाराचा दावा

हकालपट्टी की बदली?

हिरेन जोशी हे PMO मधील महत्त्वाचे अधिकारी आहेत. ते मागील 18 वर्षांपासून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याोबत काम करतात. त्यामुळे काँग्रेस नेते पवन खेरा यांनी केलेले आरोप गंभीर मानले जात आहेत. दरम्यान, सरकारडून हिरेन जोशी यांच्याबाबत कुठलाही अधिकृत खुलासा करण्यात आला नाही. त्यामुळे त्यांची हकालपट्टी झाली की बदली झाली याबाबत देखील दिल्लीच्या वर्तुळात चर्चा सुरू आहेत.

Narendra Modi
Nagar Panchayat Result : नगरपरिषद अन् नगरपंचायतीच्या निकालाचा आजच फैसला, सुप्रीम कोर्ट काय निर्णय देणार?

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com