Dhananjay Chandrachud : माजी सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी मोठा गुन्हा केलाय; शिवसेना खासदाराने का केला आरोप?

Shiv Sena Split Case : संविधानात पक्षांतरबंदी कायदा आला. पक्ष सोडून पळणाऱ्यांवर निर्बंध घातले. पण एखाद्या पक्षातून दोन तृतीयांश लोक फुटले तर त्याला मान्यता दिली गेली. तसं शिवसेनेबाबत घडलं.
Dhananjay Chandrachud-Arvind Sawant
Dhananjay Chandrachud-Arvind SawantSarkarnama
Published on
Updated on

New Delhi, 16 December : पक्षांतर बंदी कायदा, शिवसेनेचे नाव आणि चिन्हाच्या बाबत आम्ही सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. मात्र, या प्रकरणात माजी सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड साहेब तारखा देत बसले...त्यांना रामशास्त्री प्रभुणे होण्याची संधी होती. मात्र, चंद्रचूड यांनी घालवली.. चंद्रचूड यांनी मोठा गुन्हा केलाय, असा दावा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार अरविंद सावंत यांनी केला आहे.

खासदार अरविंद सावंत (Arvind Sawant) हे नवी दिल्लीत माध्यमांशी बोलत होते. त्या वेळी त्यांनी शिवसेना फुटीचे प्रकरण आणि न्यायालयीन लढाईवर भाष्य केले. ते म्हणाले, संविधानातील तरतुदी ब्रम्ह वाक्यासारख्या आहेत. संविधानात पक्षांतरबंदी कायदा आला. पक्ष सोडून पळणाऱ्यांवर निर्बंध घातले. पण एखाद्या पक्षातून दोन तृतीयांश लोक फुटले तर त्याला मान्यता दिली गेली. तसं शिवसेनेबाबत घडलं. आमदारांना अभय मिळतंय; म्हणून ते तिकडे गेले होते. काहीजण प्रलोभन, धमकी आणि ईडीमुळेही गेले आहेत.

सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) घटनेच्या दहाव्या परिष्ठाचा आधार घेऊन आमदारांना अपात्र करून शिवसेनेला न्याय दिला पाहिजे होता. पण, कोर्ट, राज्यपालांनी संविधानाने दिलेली भूमिका निभावली नाही. आमचं नाव आणि चिन्ह घेऊन गेले. यापूर्वी पक्षाचे नाव घेऊन काँग्रेसच्या कोर्टात अनेकजण गेले, पण मूळ काँग्रेसचं नाव दिलं गेलं नाही. चंद्रचूडसाहेब तारखा देत बसले...त्यांना रामशास्त्री प्रभुणे होण्याची संधी होती. मात्र, चंद्रचूड यांनी ती घालवली... चंद्रचूड यांनी मोठा गुन्हा केलाय.

मणिशंकर अय्यर यांनी प्रणव मुखर्जी यांच्याबाबत केलेल्या विधानावर अरविंद सावंत म्हणाले, इतिहासात अनेक गोष्टी झाल्या आहेत... त्यांचा आत्ता काही अर्थ नाही. मंत्रिमंडळ विस्तार आणि नाराजीला सावंतांनी भाजपला दोषी धरले आहे. सगळ्यांचं कारण भाजप आहे. राजकारणाचा बाजार मांडला आहे, ते बाजार बसवे आहेत महाराष्ट्राचा खेळखंडोबा होतोय, असा आरोपही सावंतांनी केला.

Dhananjay Chandrachud-Arvind Sawant
Tanaji Sawant : नाराज तानाजी सावंत नागपूरचे अधिवेशन सोडून तातडीने पुण्यात दाखल

भुजबळांच्या मंत्रिपदाबाबत सावंतांनी सूचक प्रतिक्रिया दिली, ते म्हणाले, सन्मानानं जगायचं ठरवलं, तर मान अपमान होत नाहीत. नागपूरला शपथविधी घेण्यावरूनही सावंतांनी भाजपवर शरसंधान साधले. मुंबईचं महत्व कमी करण्याचं कारस्थान भाजपनं केलं आहे.. त्याचा पुढचा पाढा हा आहे. पण, मुंबई देशाची आर्थिक राजधानी आहे, हे लक्षात घ्यावे, असेही सावतांनी म्हटले आहे.

परभणीच्या दंगलीवर सावंत म्हणाले, परभणी विषयावर लोकसभेत पुन्हा स्थगन प्रस्ताव दिला होता, पण ते घेतच नाहीत... आम्हाला बोलू देत नाहीत. देशातील संविधान फाडले जाते, हा संविधानाचा अवमान आहे. परभणी घटनेची दखल घ्यावी. आम्ही उद्या नरेंद्र मोदी यांना भेटणार आहोत, असेही सावंतांनी स्पष्ट केले.

Dhananjay Chandrachud-Arvind Sawant
Western Maharashtra : महायुतीच्या मंत्रिमंडळावर पश्चिम महाराष्ट्राचे वर्चस्व; उपमुख्यमंत्र्यांसह दहा मंत्रिपदे!

वन नेशन वन इलेक्शन हा मोठा गहन विषय आहे. देश काय करतोय, हे पहायाला पाहिजे. मतदार हा राजा आहे, त्याला पण विचारायला पाहिजे. जेपीसीकडे हे विधेयक गेलं पाहीजे. छोटी राज्यांवर दबाव आणण्यामुळे राज्यांची शकलं होणार आहेत. प्रादेशिक पक्ष त्यांच्या चिन्हावर लढवणार आणि राष्ट्रीय पक्ष आपल्या चिन्हावर लढणार...यात गोंधळ निर्माण होणार आहे आणि हेच तर त्यांना (भाजपला) करायचंय, असा दावाही सावंतांनी केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com