Ambedkar on Congress-NCP : साखरपुडा झाला; पण ‘ते’ दोन ‘भटजी’ अडथळे आणत आहेत, त्यामुळे प्रसंगी विनालग्नाचे राहू; पण...

Shivsena and NCP : शिवसेनेने काँग्रेस आणि राष्ट्रवादीला सेटलमेंटची तारीख मागावी.
Prakash Ambedkar
Prakash AmbedkarSarkarnama
Published on
Updated on

Akola District Political News : उद्धव ठाकरे आणि आमचा साखरपुडा झाला असला तरी लग्नाच्या मुहूर्तासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादीरूपी दोन भटजीच अडथळे आणत आहेत. त्यामुळे वेळप्रसंगी विनालग्नाचं राहू , परंतू दुसरं स्थळ पाहणार नाही, अशी मिश्कील टीका टिप्पणी वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसवर केली आहे. (should ask Shiv Sena, Congress and NCP for settlement date)

शिवसेनेने काँग्रेस आणि राष्ट्रवादीला सेटलमेंटची तारीख मागावी, तर ते तारीख देत नाहीत. भटजीच तारीख देत नसल्यानं आता 'एकला चलो रे'चा पर्याय असल्याचे आंबेडकर म्हणाले. आंबेडकर अकोल्यात काल (ता. एक) बोलत होते. या वेळी आंबेडकरांनी अनेक रूपकं वापरत काँग्रेस-राष्ट्रवादीच्या शरद पवार गटावर टीका केली.

प्रकाश आंबेडकर यांनी महायुती आणि महाविकास आघाडीतील कोणत्याही नाराज पक्षांशी आपण स्वतःहून संपर्क साधणार नसल्याचं स्पष्ट केलं आहे. पक्षातील कुणीही आपल्याशी संपर्क केला नसल्याचेही आंबेडकर म्हणाले. या सगळ्या पक्षांचा इतिहास जर बघितला, तर यांचं भाजपसोबत जायचं नाही असा इतिहास नाही. त्यामुळे कुणी बरोबर नाही म्हणून कुणाला बरोबर घ्या, अशा स्थितीत आम्ही नसल्याचे आंबेडकर यांनी स्पष्ट केले.

एका-एकाची पोलखोल करणार...

रामदास 'लेट' आठवले यांच्यासोबत या पक्षांचं जुळतं आम्ही यांच्या दृष्टीने विरोधी पक्ष नाही आहोत. त्यामुळे असं ठरवलं की कुणालाच आता संपर्क करायचा नाही. त्यामुळे जानकर, मेटे, सदाभाऊ, राजू शेट्टी त्यांच्यापैकी कुणाशीच आघाडीची शक्यताही आंबेडकर यांनी या वेळी फेटाळून लावली.

राष्ट्रवादी (शरद पवार गट) आणि काँग्रेस हे दोन्ही पक्ष राजकीय अस्पृश्यता पाळतात. आता मी एका-एकाची पोलखोल करणार असल्याचे आंबेडकर म्हणाले. मी आतापर्यंत कुटुंबामुळे शांत होतो. कुटुंबातील मुलं मोठी झालीत. त्यामुळे आता काही लोकांबद्दल बोलणार असल्याचे आंबेडकर म्हणाले.

Prakash Ambedkar
Akola Lok Sabha Constituency : अकोला लोकसभेसाठी काँग्रेसकडून उमेदवारांची चाचपणी; 'ही' नावे चर्चेत...

शिवसेनेला (ठाकरे गट) जागांचा प्रस्ताव दिला नाही...

शिवसेनेच्या ठाकरे गटाला लोकसभेसाठी पाच जागांचा प्रस्ताव दिल्याच्या चर्चेचंही आंबेडकरांनी खंडन केलं. दोन भटजींनी (काँग्रेस आणि राष्ट्रवादी) लग्नाची तारीख दिली नाही. त्यामुळे शिवसेनेच्या ताटात सध्या काही वाढलं नाही. त्यामुळे आम्ही मागणीच करू शकत नसल्याचे आंबेडकर म्हणाले.

दरम्यान, सुजात आंबेडकर अकोल्यातून लोकसभा आणि विधानसभेची कोणतीच निवडणूक लढणार नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. सामाजिक कार्य हा त्याचा पिंड असून, निवडणुकीच्या राजकारणात त्याला रस आहे का, हे त्यालाच सिद्ध करावं लागेल. अकोल्याबाहेरही त्याच्या मतदारसंघाबद्दल विचार केलेला नसल्याचं आंबेडकर म्हणाले.

हैद्राबादला मेळावा घेणार...

चंद्रशेखर रावांसोबतच्या संभाव्य मैत्रीसंदर्भात विचारले असता, त्यांनी या प्रश्नाला बगल देत आपण हैद्राबादला चार ऑक्टोबरला मागासवर्गीयातील मागासवर्गीय यांचा मेळावा घेणार असल्याचं प्रकाश आंबेडकर यांनी सांगितलं.

Edited By : Atul Mehere

Prakash Ambedkar
Akola Embezzlement in scrap sale : भंगाराच्या विक्रीत अफरातफर करणं भोवलं, महापारेषणचे आठ अधिकारी निलंबित !

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com