Political Crisis : ज्या नेत्याकडं हे खातं, त्यांचा पराभव निश्चित! आता थेट मुख्यमंत्र्यांचाच नंबर?

Nayab Singh Saini Haryana Politics Finance Minister : हरियाणामध्ये नुकतेच नवीन सरकार अस्तित्वात आले असून नायब सिंह सैनी दुसऱ्यांचा मुख्यमंत्री झाले आहेत.
Haryana Politics
Haryana PoliticsSarkarnama
Published on
Updated on

Chandigarh : हरियाणामध्ये पुन्हा नायब सिंह सैनी मुख्यमंत्री झाले असून नव्या सरकारमधील मंत्र्यांना खातेवाटपही झाले आहे. मुख्यमंत्र्यांनी त्यांच्याकडे गृह आणि अर्थ ही अत्यंत महत्वाची खाती ठेवली आहेत. पण त्यांच्यासाठी हीच धोक्याची घंटा मानली जात आहे.

हरियाणामध्ये अर्थ विभाग नेत्यांसाठी अशुभ असल्याची अनेक उदाहरणे आहेत. ज्या नेत्यांकडे हे खाते असते, त्यांचा पुढील निवडणुकीत पराभव तरी होतो किंवा ते निवडणूक लढवत नाहीत, असा इतिहास आहे. आता सैनी यांनी आपल्याकडेच हे खाते ठेवल्याने त्यांच्यावर हा नकोसा इतिहास बदलण्याचे आव्हान असणार आहे.

Haryana Politics
Prashant Kishor : प्रशांत किशोर यांची ‘रणनीती’ पहिल्याच परीक्षेत फसली; उमेदवार निवडीतच घोडचूक

काय सांगतो इतिहास?

हरियाणातील मागील आठ अर्थमंत्र्यांचा कार्यकाळ पाहिला तर हे समीकरण पक्कं झाल्याचे दिसून येईल. 1991 मध्ये हे खाते मांगेराम गुप्ता यांच्याकडे होते. पुढच्याच निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. किशन दास यांना 1996 मध्ये अर्थमंत्री करण्यात आले. त्यांनाही आमदारकी वाचवता आली नाही. त्यानंतरच्या अर्थमंत्र्यांनाही निवडणुकीत पराभूत व्हावे लागले.

संपत सिंह यांच्याकडे 2000 मध्ये अर्थखाते सोपवण्यात आले होते. तेही पराभूत झाले. 2005 आणि 2009 मध्ये अनुक्रमे बीरेंद्र सिंह आणि अजय यादव यांच्यावर या खात्याचा भार सोपवण्यात आला होता. पण या दोघांसाठीही हे पद अशुभ ठरले. 2019 ची निवडणुकही अपवाद ठरली नाही. या निवडणुकीत कॅप्टन अभिमन्यू यांचा पराभव झाला. ते 2014 पासून अर्थमंत्री होते.

Haryana Politics
Pappu Yadav : आ रहा हूं मुंबई, सबको औक़ात बताएंगे! पप्पू यादव यांचे कुणाला चॅलेंज?

माजी मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी 2019 मध्ये आपल्याकडे अर्थ खाते ठेवले होते. त्यांनी 2024 ची निवडणूक लढवली नाही. तसेच निवडणुकीच्या काही महिने आधीच मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला. मात्र, लोकसभा निवडणुकीत ते विजयी झाले. सध्या ते केंद्रात मंत्री आहेत. आता ते राज्याच्या विधानसभेत नाहीत.

खट्टर यांच्या राजीनाम्यानंतर 2024 मध्ये जे. पी. दलाल यांच्याकडे काही काळासाठीच अर्थ खाते आले. काही महिन्यांतच झालेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. आता हे खाते मुख्यमंत्री नायब सिंह सैनीकडे यांच्याकडे आहे. त्यामुळे आता हे खाते अशुभ असल्याचे समीकरण सैनी मोडित काढणार की हे पद म्हणजे राजकीय आत्महत्या असल्याचे पुन्हा शिक्कामोर्तब होणार, हे पाहावे लागेल.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com